जिल्ह्यात 31 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री उदय सामंत
यांच्या उपस्थितीत संपन्न होणार “जनता दरबार”

अलिबाग, (जिमाका):

– राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत यांच्या सूचनेनुसार सोमवार, दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे.
या जनता दरबाराकरिता जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणाप्रमुख उपस्थित राहणार असून जनता दरबाराकरिता उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना आधी टोकन क्रमांक दिले जाणार आहेत. जनता दरबारमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची नोंद घेवून त्यावर प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. प्रत्येक महिन्याला अशा प्रकारे या “जनता दरबार”चे आयोजन नियमितपणे केले जाणार आहे.
तरी नागरिकांनी सोमवार, दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे होणाऱ्या जनता दरबाराकरिता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री श्री.सामंत यांनी केले आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.