पनवेल महानगरपालिकेच्या जिझिया करा विरोधात शेतकरी कामगार पक्षातर्फे मार्गदर्शन शिबिर

प्रतिनिधी:-

पनवेल महानगरपालिकेच्या जिझिया करा विरोधात शेतकरी कामगार पक्षातर्फे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नवीन पनवेल पृथ्वी हॉल येथे केले होते. ह्या शिबिराला मार्गदर्शक म्हणून नगरसेवक लीना गरड , महादेव वाघमारे, विधी तज्ञ विजय कुरले, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, शेकाप नेते प्रभाकर कांबळे लाभले.

नवीन पनवेलच्या नागरिकांनी या निमित्ताने एक प्रण केला जो पर्यंत मालमत्ता कर कमी होणार नाही. तोपर्यंत आम्ही कर भरणार नाही ह्या शिबिराला पनवेलच्या नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

ह्या शिबिराचे आयोजक प्रभाकर कांबळे हेच आमचे सर्व प्रश्न सोडवू शकतात असे मत नागरिकांनी मांडले. प्रभाकर कांबळे सारखा नेता लोकप्रतिनिधी असावा असे वक्तव्य नवीन पनवेलच्या नागरिकांनी केले.
ह्या शिबिराला ,सुरेंद्र मधुकर सोरटे ,मिलिंद कांबळे, देवानंद पवार सर्जेराव कांबळे ,भास्कर ढोबळे आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.