हजरत पीर करमअली शाह दर्गावर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या  उत्तम प्रकृतीसाठी सय्यद अकबर यांनी केली चादर अर्पण…


पनवेल /इरफान शेख   :-
रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगराच्या मध्यवर्ती स्थापित लाखों लोकांचे श्रद्धास्थान हजरत पीर करमअली शाह दर्गावर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उत्तम निरोगी प्रकृतीसाठी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड प्रभारी कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांनी चादर चढवून दुवा केली.
लोकनेते रामशेठ ठाकूर  म्हणजे  जनतेचे साहेब गोरगरिबांचे प्रश्न ऐकून सर्वांनाच मदत करतात. सकाळ पासून त्यांच्याकडे लोकांची अक्षरशः रांग लागलेली असते. कोवीड सारख्या वातावरणात देखील त्यांच्या मदतीचा ओघ जनसामान्यांसाठी थांबला नाही.
आपल्या स्वतःच्या प्रकृती पेक्षा जनतेचे प्रश्न महत्वाचे असे त्यांचे ब्रीद कायम आहे. त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्य मिळावे लोकनेते म्हणून त्यांचे कार्य अवीरत कायम राहावे यासाठी सय्यद अकबर यांनी हजरत पीर करमअली शाह दर्गावर प्रार्थना केली.
त्यांच्यासह भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनातील अण्णा हजारेंचे खंदे कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख, जेष्ठ पत्रकार किरण बाथम,इम्तियाज बेग,विलास बोडके उपस्थित होते.
तौफिक खांडे यांनी यावेळी लवकरच होणाऱ्या हजरत पीर करमअली शाह दर्गा संदल उत्सवाच्या निमित्ताने निशाण फडकवण्याचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी अनेक भाविक देखील हजर होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.