पनवेल महानगरपालिकच्या कार्यक्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 अंतर्गत भिंगारी येथे मोफत आरेाग्य तपासणी शिबिराचे आयोजन कराडी समाज हॉल येथे करण्यात आले होते. नगरसेवक अजय बेहरा,मुख्य वैद्यकिय व आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी ,आरसीएच अधिकारी डॉ. रेहाना मुजावर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबीरात जनरल तपासणी, लहान मुलांची तपासणी,गरोदर स्त्रियांची तपासणी, किशोरवयीन मुलांमुलींची तपासणी, जेष्ठ नागरिकांची तपासणी, बीएमडी तपासणी, कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण, रक्त तपासणी करण्यात आली. रूग्णांना औषधेही देण्यात आली. तेरणा वैद्यकिय महाविद्यालयाचे डॉक्टर्सच्या माध्यमातून या तपासण्या करण्यात आल्या. याचबरोबर याठिकाणी आलेल्या लाभार्थ्यांना डॉ. रेहाना मुजावर यांनी कुटूंब नियोजन, लहान मुलांचे लसीकरण, कोविड लसीकरणाविषयीचे महत्व पटवून सांगितले. तसेच यावेळी टी.बी,लेप्रसी, मलेरिया विषयी जनजागृती करण्यात आली.

 

या आरोग्य तपासणी शिबिरासाठी रघुनाथ बहिरा, जगदीश परदेशी, सुरज परदेशी, स्वप्नाली परदेशी, हारूण शेख, सिमा आर्य , संध्या मांगुरकर,आरती परदेशी तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 चा सर्व स्टाफ यांनी सहकार्य केले.

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.