जि प सदस्य विलास फडके यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबिर संपन्न
पनवेल : ग्रामपंचायत चिपळे , होरीझन डायग्नोस्टिक व गुड हेल्थ क्लिनिक यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळेस आपली प्रस्तावना करताना डॉक्टर गिरीश इंगळे यांनी आमदार बाळाराम पाटील यांच्या कार्याचेब कौतुक केलं ते स्वतः यापूर्वी जे जे हॉस्पिटल ब्रीच कँडी हॉस्पिटल आदी ठिकाणी कार्यरत असल्याचे देखील त्यांनी सांगितलं. या शिबिराची सुरुवात होण्यापूर्वीच 300 पेक्षा जास्त लोकांनी आरोग्य तपासणी साठी रजिस्ट्रेशन केलं होतं.त्या नंतर प्रत्यक्ष येणाऱ्यांची गणती 300 हुन अधिक  होती म्हणजेच नागरिकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या शिबिराला लाभला.
या कार्यक्रमाला आमदार बाळाराम पाटील, काशिनाथ पाटील ,तालुका चिटणीस राजेश केणी ,महापालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू जिल्हापरिषद सदस्य विलासजी फडके, क्रांतिकारी सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नामदेव शेठ फडके ,रीडघर गावचे माजी सरपंच सुभाषशेठ भोपी, चिपळे ग्रामपंचायतीचे सदस्य चिपळे विहिघर, बोंनशेत येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.