जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन वागळे पोलिस दलातील महिलांचा सन्मान…

प्रतिनिधी ठाणे

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन दिं. १०/०३/२०२२ रोजी वागळे पोलिस दलातील महिलांचा सन्मान कार्यक्रमाचे  भाजपा ठाणे शहर महिला मोर्चा सरचिटणीस. अॅड. तृप्ती म. जोशी-पाटील आणि रायलादेवी मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा. सौ. संगिता अ. सांडे यांनी आयोजीत केला होता.
पोलिस इन्स्पेक्टर प्रियतमा मुठे , असिस्टंट पोलिस इस्पेक्टर वैशाली रासकर  यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या वागळे पोलिस दलातील महिला सहकार्‍यांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.


ह्या प्रसंगी भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा मृणाल ताई पेंडसे, उपाध्यक्षा प्रमोदिनी कांबळे, सदस्या धनश्री जाधव, ठाणे शहर युवा मोर्चा सदस्य प्रकाश पाल, रायलादेवी सरचिटणीस प्रविण खताळ, वार्ड अध्यक्ष धनश्याम चौधरी, सुभाष पाटील, हिरामण जाधव, तुषार महाजन, निर्मला जाधव, मधु रजपुत, मनिषा कोंगारी, निलिमा शिंदे, मालती पवार, सिध्दी जिमल, आदी उपस्थित होते.
यावेळी  आरोग्य दायी महत्व म्हणून मल्टी-व्हिटॅमिन टॅबलेटचेही वाटप करण्यात आले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.