५४ व्या मि.एशिया बॉडीबिल्डिंग कॉम्पोटीशनमध्ये सहा.पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी पटकावले सुवर्णपदक
पनवेल ) :-
54 वी मि.एशिया बॉडीबिल्डिंग कॉम्पोटीशनमध्ये पळस्पे महामार्ग पोलिसचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकावल्याने पोलीसदलांसह पनवेलकरांनी आनंद व्यक्त केला आहे.
मालदीव येथे ५४ वी मि.एशिया बॉडीबिल्डिंग कॉम्पोटीशन २०२२ स्पर्धा सुरु असून दि.15 to 21 जुलै दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत आज रोजी ८० किलो गटा मध्ये पळस्पे महामार्ग पोलिसचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांच्या या यशाने महाराष्ट्र पोलीस दलाचे व भारत देशांचे नाव उंचावले आहे. सुभाष पुंजारी यांच्यावर पोलीसदलांसह पनवेलकरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.