राज्यातील सरकार घटनाबाह्य़ बेकायदेशीर व बेईमान – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा महाडमध्ये घणाघात !
तुमचे प्रेम व आशीर्वादाची अपेक्षा !
थोडी लाज उरली असेल तर राजीनामा द्या व निवडणुकीला सामोरे जा !

शिवसेना ही राज्याची नव्हे तर देशाची गरज -माजी मंत्री अनंत गीते !

न्यायालय निकालापूर्वी शिंदे सरकारला राजीनामा द्यावा लागेल केले भाकित !

महाडमध्ये हजारो निष्ठावंतांच्या साक्षीने आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला दिला पाठींबा

प्रतिनिधी महाड :-
राज्यातील सरकार घटनाबाह्य बेकायदेशीर व बेईमानांचे असून ज्यांना सर्व दिले त्यांनी पाठीत खंजीर खुपसला यामुळे मला तुमच्याकडून प्रेम व आशीर्वादाची अपेक्षा असून मला महाराष्ट्राचे हे चित्र बदलावयाचे असल्याचे उद्गार शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज महाड येथे आयोजित केलेल्या निष्ठा यात्रेला उपस्थित हजारो शिवसैनिक बंधू भगिनी समोर बोलताना केले

.याप्रसंगी बोलताना माजी मंत्री व खासदार अनंत गिते यांनी शिवसेना ही राज्याची नव्हे तर देशाची गरज असून राज्यातील वर्तमान सरकारला न्यायालयाचा निकाल लागण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागेल असे भाकीत केले .

मागील दोन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा महाड येथे निष्ठा यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आलेल्या या जाहीरसभेला महाड पोलादपूर माणगाव मधील हजारो शिवसैनिक बंधू भगिनींसह माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवघणे बबनदादा पाटील सदानंद थरवळ बाळकृष्ण राऊळ अमित मोरे पद्माकर मोरे बंटी पोटफोडे आशिष पळसकर रघुवीर देशमुख बळीराम घाग सुवर्णाताई कारंजेअनिल मालुसरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .
जातीय आपल्या पंधरा मिनिटांच्या भाषणादरम्यान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यात झालेल्या सत्तांतराला जबाबदार असलेल्या चाळीस शिवसेनेच्या गद्दार आमदारांचा यथोचित समाचार घेताना या लोकांना थोडी जरी लाज उरली असेल तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे असे आव्हान दिले.

यावेळी पश्चात्ताप झाला असेल तर मातोश्रीचे दरवाजे असे सांगताच उपस्थित हजारो शिवसैनिक बंधू बहिणीनी त्याला तीव्र विरोध केला .
आपल्या अडीच वर्षांच्या काळात भाविका ने आपल्या कामाची सुरवात हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडला वीस कोटी रूपयांचा निधी देऊन केली याची आठवण देऊ.

आपण पर्यावरण पर्यटन मंत्री म्हणून राज्यात विविध ठिकाणी हजारो कोटी रुपयांची कामांची सुरूवात केल्याचे सांगून या चाळीस गद्दारांना त्यांच्या लायकी पेक्षा जास्त विश्वास व इज्जत मिळवून दिल्याचे नमूद केले .

चाैकट
खाकेत रुमाल घालून नव्हे तर जनतेमुळे तुम्ही आमदार झाल्याचा टोला त्यांनी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांना लगावला .
ठाकरे परिवाराला राज्यात एकटे पाडण्याचा प्रयत्न जनतेच्या प्रेम व आशीर्वादामुळे अशक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
हे जर बंड असते प्रथम सुरत व नंतर गुवाहाटीला पळून गेले नसते असे मत व्यक्त करून पाठीवर केलेल्या बारापेक्षा छातीवर वार स्वीकारायला आम्ही तयार असल्याचे सांगून ही शिवसेनेची अवलाद नसल्याचा घणाघात केला .

तत्पूर्वी माजी केंद्रीय मंत्री रायगडचे खासदार अनंत गिते यांनी आपल्या उण्यापुऱ्या पंचवीस मिनिटांच्या भाषणामध्ये स्थानिक आमदारांसह राज्यातील सर्व चाळीस फुटून गेलेल्या आमदाराचा उल्लेख गद्दार म्हणून करून हा लढा आता नेत्यांचा राहिला नसून तो जनतेचा व शिवसैनिकांचा झाल्याचे नमूद केले .

महाडच्या भुताला बाटलीमध्ये बंद करणारच या आपल्या अलिबाग येथील जाहीर सभेतील वक्तव्याची त्यांनी पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली .

शिवसेना ही महाराष्ट्राची नव्हे तर देशाची गरज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण याद्वारे इशारा देत असल्याचे सांगतानाच शिवसेनेच्या गळ्याला नख नावाचे पाप करू नका अशा शब्दात त्यांचा रोखठोक समाचार घेतला .

शिवसैनिकांसाठी शिवसेना आईच्या स्वरुपात असू आणली ती संकटात असताना तिला वाचवण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करणे आवश्यक असून आज माझे वय बाहत्तर नव्हे तर या गद्दारी नंतर सत्तावीस वर्षांचे झाल्याचे जनतेसमोर जाहीरपणे सांगितले व आत्तापर्यंत झालेली ही केवळ झाकी असून आगे बहोत कुछ बाकी असल्याचे स्पष्ट करतानाच दसरा पश्चात महाडच्या भिलारे मैदानावर विराट मेळावा घेण्याची घोषणा केली .

महाड सह राज्यातील चाळीस गद्दार आमदारांचा उल्लेख उंदीर मांजर व क्रीडा मुंग्यांप्रमाणे करून त्यांची दखल घेण्याची गरज नसल्याचंही घणाघात माजी मंत्री व खासदार अनंत गिते यांनी याप्रसंगी केला .आदित्य ठाकरे यांची राज्यभर सुरू असलेली निष्ठा यात्रा ही शिवसैनिकांमुळे यशस्वी होणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले .

केवळ दोन दिवसांच्या सूचनेनंतर आयोजित केलेल्या या निष्ठा यात्रेसाठी महाड पोलादपूर माणगाव मधील शिवसैनिकांनी दिलेला उदंड प्रतिसाद लक्षात घेता आगामी काळातील सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा विजय निश्चित असल्याची त्यांनी ग्वाही दिली .

या मान्यवरांचा जाहीर सभेपूर्वी माजी राजीप उपाध्यक्ष बाळकृष्ण राऊळ विजयराज खुळे माजी राजिप सदस्य अमित मोरे बंटी पोटफोडे अनिल मालुसरे आदिती तटकरे लहू लुष्टे रघुवीर देशमुख आदींनीही या निष्ठावान यात्रेला शिवसैनिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल तसेच उत्स्फूर्तपणे दाखवलेल्या भर पावसातील उपस्थितीबद्दल धन्यवाद देऊन आपले समयोचित विचार व्यक्त केले .
सुमारे दुपारी चार वाजता सुरू होणारी जाहीरसभा पावणेपाचच्या सुमारास सुरू होऊन सव्वासात वाजता संपन्न झाली या जाहीर सभेसाठी महाड शहर पोलिस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.