बेकायदेशीर अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्ग विकास काम पेण खोपोली रस्ताच्या पाईपलाईन चे अनेक ठिकाणी काम थांबले

प्रतिनिधी खालापूर :- साबीर शेख

पेण खोपोली रस्ता लगत सावरोली ग्रामपंचायत हद्दीतील काही बेकायदेशीर अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्ग विकास कामांमध्ये अडथळा आल्याने पाईप लाईन ची कामे ऐन पावसाळ्यात अर्धवट ठेवण्यात आली आहे .
पावसाचे पाणी खाजगी जागेत शिरल्यावर नुकसान कोण सहन करणार म्हणून उद्योजक खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे .

बेकायदेशीर  अतिक्रमणामुळे  राष्ट्रीय महामार्ग विकास कामांमध्ये अडथळा

ग्रामपंचायत कर महसूल मिळवते पण अतिक्रमण म्हणून भविष्यात वादाचे ,तांत्रिक अडचणी चे अनेक विषय बनवते

सावरोली निफान इसांबा फाटा लगत असलेले साहिल पेट्रोल पंपाचे मालक मोहम्मद इस्लाम खान सर्वे नंबर 21 च्या 2 प्लॉट नंबर 20 चे जागामालक यांच्या जागेवर काही हातावर पोट भरणाऱ्या हात गाडी लावून व्यवसाय करणाऱ्या इसमांनी अतिक्रमण केल्याने काही दिवसापासून अतिक्रमण करणाऱ्या लोकांचं वाद चालू आहे .
त्यावर विचारणा केली असता मोहम्मद इस्लाम खान यांनी आपले मत सांगताना अनेक लोकांनी ग्रामपंचायतीच्या हद्दीत व्यवसाय रोजगार करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण करून आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली आहे. परंतु त्याचा परिणाम ग्रामपंचायतीला होत नसून अनेक जागा मालकांना होत आहे .
अतिक्रमण करणार्‍यां कडे बेकायदेशीर पध्दतीने असलेली घरपट्टी असल्याने असे वाद निर्माण होतात कारण ते अतिक्रमण करणारे स्वतःला घरपट्टी मुळे जागा मालक समजतात .
ग्रामपंचायत महसूल कर भरण्यासाठी घरपट्टी कर असतो परंतु त्याचा गैरवापर करून अतिक्रमण वाढले असल्याने भविष्यात अनेक अडचणी निर्माण होतात.
अनेक विकास कामे सध्या चालू आहेत त्यात राष्ट्रीय महामार्ग खोपोली पेण रस्त्या लगत पाईप लाईन चे काम चालू आहे परंतु ते अर्धवट ठेवल्याने त्याला कारण अतिक्रमण केलेली लोक असल्याचे समजते .
बेकायदेशीर अतिक्रमण मुळे विकास अनेक कामे अर्धवट थांबली आहेत स्थानिक राजकीय बळाला दडपून ठेकेदार गप्प आहेत प्रशासन नियम न पळता अर्धवट कामे करत आहे .
पावसाच पाणी मोठ्या प्रमाणात आमच्या खाजगी जागेत साठणार असल्याने इस्लाम खान सारख्या अनेक उद्योजक जागा मालक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ग्रामपंचायत व राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आपल्या सोयीच्या पद्धतीने काम करत असून अतिक्रमणाचा मुद्दा आल्यास मागे हटत आहे .
भविष्यात ह्या तांत्रिकदृष्ट्या अडचणी वाढणार असून पाण्याचा निचरा कसा होईल हा चिंतेचा विषय बनला आहे.
ग्रामपंचायत व राष्ट्रीय महामार्ग जरा अतिक्रमणाच्या मुद्द्यावर ठोस कारवाई करत नसेल त्यातून मार्ग काढत नसेल तर विकास कामे कशी होणार जागा मालक व करदात्यांनी न्याय कोण देणार असा प्रश्न पडतो .
विकास कामे करायची असेल तर अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलावी अन्यथा भविष्यात अनेक अतिक्रमण होतील ह्यात शंका नाही .

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.