करंजाडे वसाहतीतील गरब्यात तरुणाईचा उत्साह

दांडियात सेल्फीची क्रेझ

शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत गरबा दांडिया रास 2022 चे आयोजन

सरपंच रामेश्वर आंग्रे व उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांची अथक परिश्रम

पनवेल

करंजाडे वसाहतीतील उत्साहात साजरा होणाऱ्या शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत गरबा दांडिया रास 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच रामेश्वर आंग्रे तसेच उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या गरबा दांडिया रास ला तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली तरीही तरूणाई पावसात दांडीया खेळण्याचा आनंद घेत होते, त्याचबरोबर जेष्ठ नागरिक, सदस्य, नागरिक, महिलांनी गरब्याच्या गाण्यांवर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.

गरबा आणि दांडिया प्रेमी नवरात्रोत्सवाची अतुरतेने वाट पाहत असतात. नृत्याचा आनंद घेण्यासाठी तरूणाईसह महिलांना अधिक आवड आहे. दांडिया नृत्य करण्यासाठी मोठ्या जागेची गरज लागते. यावर्षी करंजाडे वसाहतीतील येथील सेक्टर चार साकार अकॅडमीचे हार्दिक गोखणी यांच्या मैदानावर शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत गरबा दांडिया रास 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तिसऱ्या दिवशीही येथे दांडीया नृत्याची हौस पूर्ण करण्यासाठी तरूण – तरूणी मोठ्यासंख्येने उपस्तित होते. सुमारे एक हजार नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली होती तरी देखील तरूणाई पावसात दांडीया खेळण्याचा आनंद घेत होते. यावेळी एरणीच्या देवा तुला…. परी हू मैं या…झींगाट या संगीताच्या तालावर नवरात्रोत्सव गरबा रंगू लागला आहे. पारंपारीक वेशभूषेत तरूणाई थिरकू लागली आहे. करंजाडे येथील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या पधाधिकाऱ्यानी त्याचबरोबर स्वतः रामेश्वर आंग्रे व योगेंद्र कैकाडी यांनी या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुसुचित प्रकार घडु नये यासाठी महिलासाठी, मुलांसाठी तसेच लहान मुलासाठी असे वेगवेगळी दांडिया खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. गरबा व दांडीया खेळण्यासाठी तरूणाईकडून वेगवेगळ्या प्रकारचे पोषाक परिधान करीत आहे. मंडळाकडून उत्कृष्ट वेशभूषा आणि दांडीया खेळणाऱ्या स्पर्धकांना पारितोषीक देऊन गौरविण्यात येत आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.