खा. राहुल गांधींवरील ईडी कारवाईविरोधात राज्यभर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक.
सर्व जिल्हा मुख्यालयी आंदोलन
महिला काँग्रेसचा ईडी कार्यालयावर धडक मोर्चा..

रायगड जिल्ह्यात पनवेल शहर जिल्हा काँग्रेस च्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा अध्यक्ष आर सी घरत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांचा आवाज दडपू पहात आहे. ईडीने राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी केली असून पुन्हा चौकशीला बोलावले आहे.
चौकशीच्या नावाखाली राहुल गांधी यांचा मोदी सरकार छळ करत आहे. भाजपा सरकारच्या या दडपशाहीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून राज्यभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा व आंदोलन करून मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जीपीओपासून ईडी कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला.
राहुल गांधींच्या समर्थनासाठी व मोदी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी काँग्रेसच्या तृतीयपंथी सेलच्या अध्यक्ष पवन यादव यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील नरिमन पाईंट येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त करत लातूर, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, अमरावती, नागपूर, नाशिक, पनवेल, रायगड, अलिबाग, चंद्रपूर, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, संगमनेरसह सर्व जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन करण्यात आले.
आर सी घरत यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणा देत निवेदन पत्र देण्यात आले .
या वेळी काँग्रेसरायगड जिल्ह्यातील नेते पनवेल शहर जिल्हाध्यक्ष आरसी घरत पनवेल जिल्हा चिटणीस मल्लिनाथ गायकवाड युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे अनुसूचित विभाग शहराध्यक्ष मोहन गायकवाड आनंत पाटील पनवेल शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष लतीफ शेख ब्लॉक कार्याध्यक्ष अमित दवे जयंत देशमुख अमन दलाई आदी नेते उपस्थित होते