स्वर्गीय दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रंगछटा 2022 एकपात्री व द्वीपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन
पनवेल येथे दि:- 16/02/2022
रोजी चित्रपट सृष्टीचे जनक स्वर्गीय दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि रिफ्लेक्शन थिएटर, पनवेल आयोजित रंगछटा 2022 एकपात्री व द्वीपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते तथा जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे उपस्थित होते. तसेच स्पर्धकांचे मनोबल वाढविण्यासाठी व मार्गदर्शन देण्यासाठी मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ रंगकर्मी, सिनेअभिनेते जयंत सावरकर हेही उपस्थित होते.
प्रथम सत्रात नटराज पूजन व दीपप्रज्वलन याने सुरुवात करून प्रितम म्हात्रे व जयंत सावरकर यांनी स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला. या स्पर्धेसाठी स्पर्धकांचा उत्तम असा प्रतिसाद लाभला. स्पर्धेमध्ये एकूण ४५ स्पर्धकांनी भाग घेतला होता व या स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक म्हणजेच विनय जोशी व मनोहर लिमये यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेमध्ये एकूण १६ बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये सिनेअभिनेते जयंत भालेकर, सिनेअभिनेते शेखर फडके, लेखन सिद्धार्थ साळवी, सिनेअभिनेते विजय पवार, स्वराज्य चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक विहार घाग व बाल नाट्य निर्माते गायधनी हे सुद्धा उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. रंगछटा 2022 या स्पर्धेचे एकपात्री अभिनय स्पर्धेचे प्रथम पारितोषिक स्वप्नील साळवी, द्वितीय पारितोषिक परेश राजश्री, तृतीय पारितोषिक स्वप्नील रसाळ, उत्तेजनार्थ ऋतुजा, अजिंक्य टेकाले, शिवदास कुमटे, कल्याणी म्हात्रे, वैष्णवी पाटील व लक्षवेधी एकपात्री सिद्धी पवार यांना देण्यात आले. द्विपात्री अभिनय स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक अक्षता साळवी व रसिका पवार, द्वितीय पारितोषिक स्वप्निल बनकर, सिद्धेश शिंदे व तृतीय पारितोषिक यश खाडे, ग्रंथा घाग, उत्तेजनार्थ आंचल जैन, सिद्धेश शिंदे, स्वप्नील बनकर, ग्रंथा घाग, द्विपात्री विनोदी अक्षता साळवी द्वीपात्री लक्षवेधी दिया राणे यांना देण्यात आले.