प्रतिनिधी ।
रसायनी माजगांव – आंबिवली यांच्या वतीने आयोजित मर्यादित टेनिस क्रिकेट स्पर्धेत पन्हाळा छावा संघाने प्रथम क्रमांकाचा विजय संपादित केला .
द्वितीय क्रमांकाचे यश शिवनेरी सरदार या संघांनी मिळविले आहे. या स्पर्धेत परिसरातील एकूण 8 नामांकित संघांनी सहभाग घेतला होता. या क्रिकेट सामन्याचे आयोजन परिसरातील क्रिडा प्रेमीसाठी विशेषतः माजगांव आंबिवली,पौध, वारद, आदिवासीवाड्या येथील तरुण मुलांसाठी करण्यात आले होते. या स्पर्धेतील मालिकावीर बहुमान पंकज जाधव, प्रभाकर लबडे यांच्या कडून धनंजय जाधव यांना चषक देण्यात आले.
स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून वै.लक्ष्मीबाई नारायण पाटील यांच्या स्मरनार्थ ओमकार महाब्दी यांस चषक देण्यात आले. तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विनायक गायकवाड यांच्या हस्ते शैलेस महाब्दी यांस देण्यात आले.तसेच विजयी संघांना व वैयक्तिक बक्षीस रोख रक्कम स्वरूपात मिळाले. या क्रिकेट मध्ये प्रथम क्रमांकाचे भव्य चषक समिर काठवले यांच्या कडून तर द्वीतीय क्रमांकाचे चषक कृष्णा पाटील, मिलिंद गायकवाड, संतोष काबंळे यांच्याकडून देण्यात आले. स्पर्धेचे समावोलोचन प्रकाश पाटील, मच्छिंद्र पाटील यांनी केले.