पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने माझं गाव माझी शाखेचे उद्घाटन…
प्रतिनिधी प्रेरणा गावंड
माझ गाव.. माझी शाखा.. ह्या संघटन बांधणी अभियानाच्या अंतर्गत पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस आढावा बैठक पनवेल पक्ष कार्यालयात संपन्न झाली.
राज्यातील काँगेस पक्ष संघटना वाढवीच्या दृष्टिकोनातून 80 हजार बुथ जोडण्याचा संकल्प असल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व सह प्रभारी महाराष्ट्र प्रदेश युवक प्रदीप सिंधव यांच्या मार्गदर्शना खाली पनवेल शहर युवक जिल्हा काँग्रेस बैठक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
पनवेल शहर, खारघर ,कामोठे,तळोजा या ठिकाणी सहा शाखेचे उद्घाटन युवक प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
या बैठकीला पनवेल जिल्हा अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या वतीने पनवेल शहर अध्यक्ष राकेश जाधव यांच्या हस्ते युवक प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत व मान्यवरांचा विशेष सत्कार केला.
या बैठकीसाठी त्याच्या नेत्या कोकण प्रभारी सोनल लक्ष्मी घाग प्रदेश सरचिटणीस श्रीनिवास नल्लाम वर उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे पनवेल शहर जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, प्रदेश सचिव विश्वजीत पाटील , शहर जिल्हा युवक उपाध्यक्ष अभिजीत पाटील, युवक शहर अध्यक्ष राकेश जाधव ,माजी नगरसेवक लतीफ शेख , जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष नोफिल सय्यद, माजी नगरसेविका निर्मला म्हात्रे , नगरसेविका मंजुला कातकरी, रोहन जानोलकर , अनुसूचित जिल्हा विभागाचे नेते मोहन गायकवाड ,तळोजा फेस टू चा अध्यक्ष मोरेश्वर पाटील, शाखा अध्यक्ष उमेश निघुकर ,उपाध्यक्ष सागर पोरजी आदी मान्यवर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.