कामोठे सेक्टर २० येथे युवक कॉंग्रेसच्या वतीने “माझा गाव, माझी शाखा” चे उद्घाटन
प्रतिनिधी/पनवेल (प्रेरणा गावंड)
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने “माझा गाव, माझी शाखा” या अभियानांतर्गत युवक काँग्रेसच्या कामोठे शहर सेक्टर २० शाखेचे उद्घाटन पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज (दादा) म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजित पाटील, सोशल मीडिया समन्वयक डॉ धनंजय क्षीरसागर, महिला जिल्हा अनु जाती विभाग अध्यक्षा माया अहिरे मॅडम, कामोठे उपाध्यक्ष जयेश लोखंडे, पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित मुंडक्कल, राहुल सावंत, काशिफ इमाम, नवीन पनवेल शहर युवक अध्यक्ष मर्फी म्हसकर, पनवेल शहर अध्यक्ष राकेश जाधव, नवीन पनवेल अध्यक्ष राहुल जानोरकर, सचिव सत्येंद्र सिंग, एम के सिंग, अनिलकुमार मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन कोमोठे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सूरज रामदास नरुटे व शाखा अध्यक्ष संकेत करे यांनी केला होता.