RAY एज्युकेशन सोसायटीच्या RAY एज्युकेअर लर्निंग सेंटरचे पनवेल एज्युकेशन सोसायटीचे इकबाल काझी यांचा शुभहस्ते उदघाटन.

*पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे यांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा.*

पनवेल/प्रतिनिधी : लॉकडाऊन काळामध्ये इतर व्यवसायप्रमाणे शिक्षण क्षेत्रात देखील मंदी आली. आजपर्यंत शाळा नियमितपणे सुरू झालेल्या नाहीत तरी देखील RAY एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आयेशा रणदिवे यांनी हिम्मत करून दोस्ती हेरिटेज शॉप नंबर १ & २ ,प्लॉट नंबर २६ , करंजाडे सेक्टर ४ येथे RAY एज्युकेअर लर्निंग सेंटर सूरु केले आहे . या RAY एज्युकेअर लर्निंग सेंटरचे उदघाटन पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल काझी यांचा शुभहस्ते करण्यात आले. पनवेल महापालिका विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे यांनी यावेळी उपस्थित राहून RAY एज्युकेशन सोसायटीच्या आयेशा रणदिवे व त्यांचा टीम ला शुभेच्छा दिल्या. RAY एज्युकेअर लर्निंग सेंटर मध्ये नर्सरी , सिनिअर केजी , पहिली ते पाचवी , पाचवी ते दहावी (स्टेट बोर्ड , सीबीएसइ , आयसीएसइ सेमी इंग्लिश) अकरावी ते बारावी (विज्ञान आणि वाणिज्य) आदींचे कोचिंग क्लासेस सुरू करण्यात येणार असल्याची माहीती अध्यक्षा आयेशा रणदिवे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रम सोहळ्यास पनवेल महापालिका विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे , प्रसिद्ध उद्योजक पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल काझी , पनवेल महापालिका नगरसेवक मुकीत काझी , आपला आधार फाउंडेशन चे अध्यक्ष तथा राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक , करंजाडे पोलीस पाटील कुणाल लोंढे , प्रसिद्ध गजलकार एन.डी. खान , RAY एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आयेशा रणदिवे ,ओमकार महाडिक , याकूब रणदिवे , कारवान फाउंडेशनच्या शाहीना मिरजानकर , दिनकर गव्हाणकर यांचासह पालकवर्ग व हितचिंतक उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.