क्वालिटास गार्डन सोसायटीमध्ये  विविध कार्यक्रम करून स्वातंत्र्य उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला

पनवेल /प्रतिनिधी(प्रेरणा गावंड)

कोप्रोलीतील क्वालिटास गार्डन सोसायटीमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

गृह निर्माण संस्था आणी नागरिकांची सुरक्षितता हा महत्वाचा विषय आहे.असे म्हणून त्यांनी सर्वांना नागरिक म्हणून सर्वांची काय जबाबदारी आहे याची सखोल माहिती दिली.

सोसायटीचे चेअरमन भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार सय्यद अकबर यांनी सकाळ पासून सर्व वातावरण देशभक्तिमय केले होते.यावेळी सोसायटीमधील सेक्रेटरी विश्वास किंद्रे,खजिनदार गजानन चणाले,नितीन गांधले,राजू चव्हाण,मारुती मरळ, ऋषी जैस्वाल,श्री.वडके यांनी आपापले विचार व कलेचे प्रदर्शन केले.

दौंडकर यांच्याहस्ते निवृत्त सैनिकांसह काही जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
सुरुवातीला बासरी वादक सचिन नागलकर यांनी बासरीच्या माध्यमातून राष्ट्र गीते सादर केली तसेच चिमुकल्या मुला मुलींनी नृत्य व राष्ट्र गीते सादर करत आपल्या कलेच्या माध्यमातून काही मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक विचार मांडून देशाप्रती आपल्या संवेदना मांडल्या.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.