श्रवण-मनन-निजध्यासाच्या माध्यमातून सुख-शांती-समाधान मिळवून देण्याचं महान कार्य करणाऱ्या  रायगड जिल्ह्यातील  निरुपणकार धर्माधिकारी कुटुंबाच्या सन्मानात आंतरराष्ट्रीय पुरस्काराची भर…..

———-///////————/////////——

डॉक्टरेट पदवी मिळवण्याची  ऐतिहासिक हॅट्ट्रिक :-

* निरुपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी  यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ,डॉक्टरेट, ‘डी. लिट.’ ही मानद पदवी

* डॉ.आप्पा साहेब धर्माधिकारी यांना  विद्यालंकार’ / सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान  पद्मश्री ही पदवी बहाल केली

* डॉ. सचिनदादां धर्माधिकारी  ‘रायगड भूषण’/ आंतरराष्ट्रीय डॉक्टरेट हा पुरस्कार

रायगड : प्रतिनिधी

श्री समर्थ बैठकीत आध्यात्मिक शिकवणीतुन  अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान व आरोग्यविषयक शिबिरं अश्या अनेक सामाजिक कार्य फक्त ” जय सदगुरू या नामस्मरनातून  आपले कर्तव्य समजून कोट्यधीश श्री समर्थ  देश भरात  दरवर्षी  देशहितार्थ सामाजिक  कार्य  म्हणून  करतात  .

“जय सद्गुगुरु ” या शब्दाने कोट्यवधी लोकांच्या जीवनात सुखद बदल आणणाऱ्या निरुपणकार धर्माधिकारी कुटुंबाच्या योगदानाबद्दल देश नेहमी त्यांच्या कार्याची दखल घेत असतो.   देशात अनेक श्री दासभक्तांनी  हा आनंद उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्या  मागचं कारण म्हणजे  निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी “‘ यांना ‘Living Legend’ म्हणून गौरवण्यात आले. त्यावेळी विशेष सन्मान म्हणून  रायगड भूषण निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांना  पॅरिस युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटकडून बॅकाॅक येथे मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.     देशभरात  हा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील कुटुंब  धर्माधिकारी कुटुंबियांनी गेली ७५ वर्षे केलेल्या आध्यात्मिक- सामाजिक कार्यामुळे या कुटुंबातील सलग तीन पिढ्यांनी मानद डॉक्टरेट पदवी मिळवण्याची ऐतिहासिक हॅट्ट्रिक साधली आहे.
सचिनदादा धर्माधिकारी हे धर्माधिकारी कुटुंबातील  तिसऱ्या पिढीतील श्रध्दा स्थान आहेत.
या वेळी “‘ पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी “‘ यांना ‘Living Legend’ म्हणून मोठ्या आदरानं गौरवण्यात आले.
जगभरातील श्रीसदस्यांना श्रवण- मनन- निजध्यासाच्या माध्यमातून प्रबोधन ,सुख- शांती- समाधान मिळवून देण्याचं महान समाज कार्य श्री धर्माधिकारी कुटुंबांनी करून कोट्यवधी श्रीसदस्यांच्या जीवनात श्रद्धास्थान ठरले .
देशातील नवीन पिढीला निरुपणकार सचिन धर्मधिकारी यांनी आपल्या जीवनात प्रबोधनकारातून ,समाज कार्यातून नेहमी देशभक्ती ,समाज ,संस्कृती अश्या अनेक विषयांवर आदर्श म्हणून समाजहितासाठी सामाजिक उपक्रम, मार्गदर्शन केले. त्यांना मिळालेली ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदवी खऱ्या अर्थाने आज देश सन्मान म्हणून प्रेरणादायी क्षण आहे . देशात अनेक राज्यात हा आनंद उत्साह वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला .
श्री भक्तांसाठी अभिमानास्पद , अविस्मरणीय आठवण म्हणून हा दिवस अनेकांच्या जीवनावर श्रद्धास्थान म्हणून प्रभाव निर्माण करण्यासाठी नेहमी स्मरणात राहील .

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.