जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि दीपक क्लिनिकल लॅब्रोटरी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत थायरॉईड टेस्टचे आयोजन
जे. एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या
आरोग्याच्या दृष्टीने नऊ दिवस हा आरोग्य उत्सव साजरा करण्याचे नियोजन माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित.
प्रतिनिधी /पनवेल:-
नवरात्रीनिमित्त विविध मंडळांमार्फत नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते. जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत यावर्षी श्री.क्षेत्र पंचायत मंदिर नढाळ, चौक येथे नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी संस्थेच्या माध्यमातून पनवेल, नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी परिसरातील महिलांसाठी जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि दीपक क्लिनिकल लॅब्रोटरी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत थायरॉईड टेस्टचे आयोजन २६ सप्टेंबर २०२२ ते ४ ऑक्टोबर २०२२ या दिवसात सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत दीपक क्लिनिकल लॅबोरेटरी, शॉप नंबर ४ वास्तू श्री सोसायटी, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा
रुग्णालय पनवेल समोर, पनवेल येथे आरोग्य सेवा आज पासून चालू करण्यात आली. यावेळी तपासणी करणाऱ्या सर्व महिलांना विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे अध्यक्ष असलेल्या जे. एम. म्हात्रे
चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून एक सेवाकार्ड भेट म्हणून देत आहे.
त्यामध्ये ५० टक्केपर्यंत सवलतीच्या दरात रक्ततपासणी, उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल निराधार गरजू रुग्णांना मोफत फळ
सेवा, माफक दरात एक्स-रे, O.P.G. E.C.G. सेवा मोफत E-
श्रम कार्ड नोंदणी, विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन, ना नफा ना तोटा तत्त्वावर रुग्णवाहिका सेवा या सेवेचा लाभ महिला आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य घेऊ शकतो सर्वांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा व निरोगी आयुष्य जगून आपली कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी महिला वर्गणी स्वास्थ्य निरोगी राहून पार पाडावी व अशा प्रकारचे आरोग्य शिबिर संस्थेच्या व पक्षाच्या माध्यमातून वर्षभर आरोग्य सेवा म्हणून चालू राहावी अशी आज आई दुर्गा चरणी आम्ही प्रार्थना करतो असे जे म्हात्रे चॅरिटेबल संस्था व शेकाप नेते प्रितम म्हात्रे यांनी मत व्यक्त केले
त्यावेळी उपस्थित माजी नगरसेविक सुरेखा मोहकर तसेच संस्थेचे सहकारी मंगेश अपराज ,रोहन गावंड आदी शेकाप कार्यकर्ते पदाधिकारी व मान्य वर उपस्थित होते.