आद्य क्रांतिवीर फडके नाट्यगृहात लतादीदींना वहनयात आली संगीतमय श्रद्धांजली,

पनवेल : जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना शुक्रवारी संध्याकाळी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘तुम मुझे यू भुला ना पाओगे’ या सांगितिक कार्यक्रमातून श्रद्धांजली वाहिली. यावेली लतादीदींच्या निवडक गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. ज्येष्ठ संगीत संयोजक अजय मदन, गायिका संगीता मेळेकर, मिथिला माळी, प्राजक्ता सातर्डेकर, निवेदक आर. जे. गौरव यांसह वाद्यवृंदाने सादर केलेल्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. याप्रसंगी लतादीदींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

         या वेळी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, उरणचे माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उद्योजक दिलीप पाटील, शेकाप नेते नारायण घरत, काशिनाथ पाटील, आर. सी. घरत, साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रवींद्र पाटील, सुदाम पाटील, रामदास शेवाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी आदींसह संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             लतादीदींच्या जाण्याने संगीतविश्वात पोकळी निर्माण झाली आहे. लतादीदींच्या गाण्यांतून सांगितिक श्रद्धांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पनवेल व उरण तालुक्यातील नागरिकांना लतादीदींच्या गाण्यांचे प्रेम देण्याचा प्रयत्न कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला, असे पालिकेचे विरोधी पक्षनेते तथा जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.