कारवाईची मागणी करुनही कनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने जगताप यांचा उपोषणाचा ईशारा..

खोपोली – (किशोर साळुंके )
कर्जत तालुक्यातील दहिवली गावातील आनंद जगताप यांच्या वहिवाटेच्या जागेत त्रयस्थ वेक्तिने शासनाची परवाणगी न घेताच अनधिकृत बांधकाम केले असून कर्जत नगरपरिषदेत वारंवार तक्रार करुनही कारवाई न झाल्याने जगतात यांनी ईशारा दिला आहे.सविस्तर हकीकत अशी कि कर्जत तालुक्यातील दहिवली गावात विठ्ठल मंदिरा समोर आनंद जगताप यांची वहिवाटेची जागा आहे.घरासमोर असणार्या मोकळ्या जागेचा वापर हे कुटुंबीय वहिवाटेसाठी करीत आहेत .परंतू या जागेतच राकेश जुन्नरकर यांनी आनंद जगताप यांना दमदाटी करुन अनधिकृत बांधकाम केले आहे.सदर बांधकामास कोणत्याही प्रकारची शासकीय स्तरावर परवाणगी घेतली नाही.जाणिवपूर्वक जगताप यांना नाहक मानसिक त्रास देण्यासाठीच त्यांची वहिवाट अडवून तेथे बेकायदेशीर बांधकाम केले आहे.याबाबत आनंद जगताप यांनी कर्जत नगरपरिषदेत अनेकदा तक्रार दिली .परंतू त्यांच्या तक्रार आर्जाला केराची टोपली दाखवून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली गेली नाही.आनंद जगताप हे मागासवर्गिय असल्याने त्यांना त्रास देण्याचे काम सूरु असून कनपाचे अधिकारी कारवाई करत नसल्याचा आरोप जगतापांनी केला आहे,मानसिक दडपणाखाली असणार्या जगताप यांनी कर्जत पोलीस ठाणे, तहसिल कार्यालय,प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडेही तक्रार अर्ज दिले आहेत .परंतू कारवाई होत नसल्यामुळे सरते शेवटी आनंद जगताप हे आपल्या कृटुंबीयांसोबत कर्जत नगरपरिषदे कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे समजत असून कर्जत नगरपरिषदेचा नूकताच पदभार घेणार्या मुख्याधिकारी भगणे मँडम या मागासवर्गिय असणार्या आनंद जगताप कुटुंबीयांना न्याय देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.