पत्रकार विशाल रावसाहेब सावंत यांची ऑल मीडिया प्रेस असोसिएशनच्या रायगड सचिवपदी नियुक्ती.*
पनवेल / प्रतिनिधी :
पनवेल तसेच रायगड जिल्ह्यातील पत्रकार तथा रायगड संदेश वृत्तपत्राचे संपादक विशाल रावसाहेब सावंत यांची ऑल मीडिया प्रेस असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेशकुमार कुशवाह व महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षा अमिता कदम तसेच रायगड जिल्हाध्यक्ष केवल महाडिक यांनी ऑल मीडिया प्रेस असोसिएशनच्या रायगड सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना याबाबत संस्थेतर्फे नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात आले आहे. केवल महाडिक यांच्यासोबतच विशाल सावंत देखील खांद्याला खांदा लावून काम करणार असून त्यांच्या पत्रकारितेचा फायदा संघटनेला होणार असून भविष्यात या संघटनेमार्फत विविध कार्यक्रम तसेच पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रम राबविले जाणार आहेत. या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून विशाल सावंत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ऑल मीडिया प्रेस असोसिएशन हि संस्था सर्वसामान्य व तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. रायगड जिल्ह्यात एक तरुण तडफदार पत्रकारांची फळी तयार करण्यात येत असून भविष्यात अजूनही नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
*अमिता कदम, ऑल मीडिया प्रेस असोसिएशन राज्य महिलाध्यक्षा.*

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.