खालापूर नगर पंचायत माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेविका शिवानी जंगम यांचे खोपोलीकरांना अवाहन..

प्रतिनिधी / साबीर शेख

खोपोलीत पहिल्यांदाच बचत गटाच्या माध्यमातून दिवाळी फराळ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. महिला बचत गटांना बळकटी देण्यासाठी दिवाळी फराळाची खरेदी करा असे अवाहन माजी उपनगराध्यक्षा ,विद्यमान नगरसेविका शिवानी जंगम यांनी खोपोलीकरांना उद्घाटन प्रसंगी बोलताना केले आहे.

खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना खुली बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी स्वामिनी महिला प्रतिष्ठाने दिवाळी महोत्सव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी तहसिलदार आयुब तांबोली, माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, मोहन औसरमल, किशोर पानसरे, केविना गायकवाड, खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा ,विद्यमान नगरसेवीका शिवानी  जंगम, बालाजी ताठे, अर्चना सुळ, प्रज्ञा पाटील, सुवर्णा मोरे, कांचन जाधव, संजय जाधव, मुनिदास गायकवाड, डॉ.सुनिल पाटील, एकनाथ पिंगळे, शिरीष पवार आदि उपस्थित होते.

नढाळ, उसरोली, आपटी, डोणवत, ढेकू तसेच खोपोलीतील बचत गटांनी निरनिराळे फराळ, मिठाई, आकर्षक रोषणाईची साधने, भेटवस्तू अल्प किंमतीत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.