तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन च्या सहकार्याने खारघर सेक्टर 26 ते 38 या परिसराती बीट पोलीस चौकी  पुन्हा  सक्रिय कार्यान्वित 

प्रतिनिधी खारघर :- कायदा सुरक्षा सुव्यवस्था रहावी म्हणून खारघर सेक्टर 26 ते 38 या परिसराती बीट पोलीस चौकी संकल्पना असल्याने पुन्हा कार्यान्वित केली.


,खारघर रहिवाशांना खारघर पोलीस ठाणे येथून साडेपाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे, गुन्हेगारांना गुन्हा करून सर्रास पळ काढता येत असल्याने या परिसरात बेकायदेशीर कृत्य व दिवसेंदिवस चेन स्नॅचिंग व मोबाईल चोरी चे प्रकार वाढत आहे.

गुन्हेगारांना व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी, तसेच घटनास्थळी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी बीट पोलीस चौकीचे संकल्पना, महाराष्ट्र राज्य शासनाने फार पूर्वी पासून अमलात आणलेले आहे. मात्र असे असताना, ओवे बीट चौकी त्याची पूर्ण दुरवस्था, तसेच दैनंदिन कामकाज करण्यासाठी योग्य पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे, पोलीस कर्मचारी इथे बसत नसल्यामुळे, हे बिट चौक बंद अवस्थेत होती.

ओवे गाव बीट चौकी चे जीर्णोदवार व मूलभूत सुविधा उपलब्ध करून, पोलीस कर्मचारी नित्य नेमाने चौकीत हजर राहावे ह्या हेतूने, खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री मंगेश रानवडे व उपाध्यक्ष श्री इम्तियाज शेख यांनी याबाबत पुढाकार घेतला.

खारघर पोलिस ठाण्यातील, पोलीस पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून, तसेच बिट चौकी पूर्णतः नवे रूप देऊन, ही पोलिस बीट चौकी दिनांक 23 मे रोजी पासून पुन्हा कार्यान्वित केली.

पूर्ववत झालेल्या बिट पोलिस चौकीचे उद्घाटन खारघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सौ बिडवे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास, खारघर सेक्टर 26 ,38 चे बरेच रहिवासी उपस्थित राहू त्यांनी खारघर तळोजा कॉलनी वेलफेअर असोसिएशनचे आभार मानले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.