खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन ने मुस्लिम दाऊदी बोहरा समुदायासाठी दफनभूमी मागणी केली.
प्रतिनिधी खारघर :-
2 फेब्रुवारी 2022 रोजी खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष मंगेश रानवडे आणि जोएब शेख यांच्या नेतृत्वाखाली दाऊदी बोहरा समाजाच्या शिष्टमंडळाने पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन दाऊदी बोहरा समाजाच्या स्मशानभूमी साठी मागणी केली.
दाऊदी बोहरा जमात ट्रस्ट खारघरचे सदस्य
शेख अबीजर राजकोटवाला (सचिव), मुर्तझा हार्नेसवाला (कोषाध्यक्ष) जोएब शेख आणि अलियासगर बनतवाला व अन्य मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय दाऊदी बोहरा समाजासाठी दफनभूमीचा होता . पर्याय परिस्थिती म्हणून आपल्या प्रियजनांच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह 20 ते 25 किलोमीटर लांब कोपर खैरणे किंवा मुंब्रा येथे जावे लागत असायचे . ह्यामुळे ह्या समाजातील लोकांना बरेच गैरसोयी चा सामना करावा लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
खारघर दाऊदी बोहरा समाजाच्या शिष्टमंडळाला आयुक्त गणेश देशमुख यांनी तातडीने उपायुक्त सचिन पवार आणि उपायुक्त कैलास यांच्याशी या विषयावर चर्चा करण्यास आमंत्रित केले व या विषयावर सखोल चर्चा केल्यानंतर दाऊदी बोहरा समाजासाठी निश्चितपणे भूखंड वाटप करण्यात येईल, मात्र सद्या सर्व भूखंडांसाठी सिडको ते पीएमसीकडे हस्तांतरित प्रक्रिया होत असल्याने, ही प्रक्रिया पूर्ण होताच वाटप केले जाईल असे आश्वासन आयुक्त गणेश देशमुख यांनी शिस्तामंडळाला दिले.
पीएमसीने दाऊदी बोहरा समुदायासाठी स्वतंत्र दफनभूमी मंजूर केली आहे असे प्रतिपादन करून, लवकरच तपशील जाहीर करू असे आश्वासीत केल्याने खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन व बोहरा समाज शिष्टमंडळाने आभार व्यक्त केले.