खोपोली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

लग्न समारंभात चोरी करणारी आंतरराज्य टोळीला खोपोली पोलिसांनी केली गजाआड

प्रतिनिधी /खोपोली ( प्रेरणा गावंड)

पोलीस हद्दीतील एका नामांकित हॉटेलमध्ये लग्न समारंभ चालू असताना नवरी मुलींच्या आईकडे असलेली सोने ठेवलेली बॅग अतिशय सफाईदार रित्या चोरी करून चोरांनी तिथून पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांचे मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक राकेश कदम व पोलीस अंमलदार प्रसाद पाटील , प्रवीण भालेराव, प्रदीप खरात , रामा मासाळ, स्वागत तांबे यांना तपास करण्यासाठी आदेशित होते.

सदर घटनेच्या अनुषंगाने समारंभातील आलेल्या एकूण 500 पेक्षा अधिक व्यक्तींची परिपूर्ण माहिती घेवून खोपोली व परिसरातील तब्बल 80 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करून आरोपितांची छायाचित्रे आणि इतर हालचालींची माहिती गोळा केली.

लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीची व रेकॉर्डवरील आरोपी ची गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यातून माहिती गोळा करण्यात आली.. परंतु इतके प्रयत्न चालू असताना पर्याप्त माहिती व तपासात यश मिळत नव्हते.. त्यावर सपोनि कदम व टीम यांनी तपास कामाला वेग देत पुन्हा सर्व फुटेज व उपलब्ध माहिती तांत्रिक विश्लेषण यांचे अवलोकन करण्यास सूरवात केली आणि अखेर तपासात उपयुक्त धागा मिळाला त्यावर तत्काळ सपोनि राकेश कदम , पोलिस प्रवीण भालेराव , प्रदीप खरात
यांनी गुन्हेगारांना राजस्थान येथून ताब्यात घेतले.. सदर आरोपीकडे चोरी केलेल्या सोन्याबाबत चौकशी केली असता सदरचे सोन्यापैकी काही दागिने हे राजगड मध्यप्रदेश येथे ठेवल्या असल्याबाबत सांगितले.त्यावर सपोनि कदम व टीम ने तात्काळ मध्य प्रदेश गाठले. आरोपीच्या गावातील माहिती काढली तेव्हा सदर गावातील 90% लोक हे अश्याच पद्धतीने गुन्हे करतात. सदर गुन्हा करताना आरोपी लहान मुलांचा वापर करतात. ,लहान मुले दागिना ठेवलेली बॅग चोरी करतात. पोलीस त्यांना शोधत गावात आले की गावकरी त्यांच्यावर हल्ला करत दगड फेक करतात 2 महिन्यापूर्वी पोलीस आरोपीचा शोध घेत असताना गावकऱ्यांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी जमावावर गोळीबार केल्याची घटना तेथे घडली होती. या सर्व गोष्टींचा अवलोकन केल्यावर वेशांतर करून माहिती घेवून चोरी झालेला गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले. संपूर्ण तपासात गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश राज्यात 8 दिवसात जवळपास 5 हजार किमी प्रवास करून कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणला असून पुढील तपास सपोनि राकेश कदम खोपोली पोलीस ठाणे हे करीत आहेत संबंधित गुन्ह्याबाबत यशस्वी पद्धतीने तपास केल्याबद्दल अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

—- जाहिरात व संपर्कासाठी 8805288798

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.