खोपोली उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी शहरातील अनेक नवरात्र उत्सव मंडळांना भेट देऊन दुर्गा मातेचे दर्शन घेतले

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त धार्मिकतेतून सुसंस्कृत पिढी निर्माण होते आपल्या महान परंपरेचे जतन व्हावे यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन, आपले सण- उत्सव नेहमीच उत्साहात साजरे करायला हवे ! उपनगराध्यक्ष कुलदीपक रामदास शेंडे

प्रतिनिधी खोपोली

खोपोली शहरात सार्वत्रिक नवरात्रौत्सव निमित्त सोमवारी २६.०९.२०२२ रोजी “दुर्गामातेचे” आगमन झाले.
कुलदीपक शेंडे यांनी देवीचे दर्शन घेऊन सर्व मंडळास व तेथील नागरिकांना आणि दांडिया रसिकांना नवरात्रौत्सवाच्या मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या व यानिमित्त दांडिया रसिकांमध्ये ( गरब्याकरिता ) सर्वीकडे आनंदी व उत्साह निर्माण होत असतो . ह्या वर्षी मी त्यात सहभागी असल्याचे समाधान वाटते असे मत शेंडे यांनी व्यक्त केले.

या नवरात्रौत्सव निमित्त शिवशक्ती मित्र मंडळ यांनी “दुर्गामातेच्या मूर्तीची ” स्थापना केली . दरवर्षीप्रमाणे हा बाजारपेठ येथील उत्सव खूप मोठ्या प्रमाणात जल्लोषात सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला जातो.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या स्वागतासाठी मंडळाचे योगेश पुरी, यशवंत पुरी, निलेश पुरी व इतर त्यांचे सहकारी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्योजक केतन रामदास शेंडे यांचेही स्वागत व सन्मान करण्यात आले .

तसेच गगनगिरी मित्र मंडळ वरची खोपोली चे सर्वेसर्वा माजी सभापती खो.न. पा लक्ष्मणजी रिठे व गंगणगिरी मित्र मंडळ, परिवाराने आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवाच्या आरतीचा मान शेंडे यांना देण्यात आला.

 

साईबाबा नगर येथील साई श्रद्धा मित्र मंडळ नवरात्र उत्सवाच्या मंडळालाही भेट देऊन  देवीचे दर्शन व उपस्थित स्थानिक ग्रामस्थांना शुभेच्छा देण्यात आल्या, त्यावेळी मंगेश काळोखे व त्यांचे सर्व मित्र परिवार ,सभासद ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

खोपोली शहरातील सहकार नगर येथील सुवर्णयोग नवरात्र मित्रमंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन आरती व उपस्थित दांडिया रसिकांसोबत मनसोक्त चर्चा करण्यात आली यावेळी निखिल रिटे, सलमान शेख ,राहुल साठे आदी सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदू धर्मातील सण उत्सव पारंपारिक पद्धतीने वर्षानुवर्षे जगभरात चालत आलेली असून त्यावर वेळ मर्यादा करण्यात आली होती, परंतु नवरात्र, दुर्गा पूजा  उत्सव  शेवटचे तीन दिवस  रात्री  बारा वाजेपर्यंत करता येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयाचे मी सुद्धा स्वागत करीत असून तमाम हिंदू बांधवांच्या वतीने  त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो असे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी मत मांडले .

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.