गद्दार नव्हे खुद्दार !
कर्जत खालापूर मतदार संघातील शिवसेना युवासेना व महिला आघाडी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपस्थित राहून शिवसैनिकां समोर भावना व्यक्त केल्या.

मा. मंत्री उदय सामंतजी व खासदार आप्पासाहेब बारणे यांनी देखील मेळाव्याला उपस्थित राहत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन दिले. जमलेली ही गर्दीच सांगून जाते की जनमत नक्की कोणाच्या बाजूने आहे.

प्रतिनिधी प्रेरणा गावंड:-

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड करत सरकार स्थापन केले. त्यानंतर सातत्याने उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर टीका केली जात आहे. पण यामध्ये बंडखोर आमदारांनी राजकारणात येण्याआधी केलेल्या व्यवसायांवरुन त्यांच्यावर टीका केली जात असल्याबाबत शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांनी आता प्रत्युत्तर दिले आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये शिवसेना मेळाव्या दरम्यान मंत्री उदय सामंत, भरत गोगावले सहभागीयांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
उद्धव ठाकरे गटातील नेते शिंदे गटातील आमदार, मंत्र्यांना त्यांच्या व्यवसायावरून हिणवत आहेत. एकनाथ शिंदे यांना रिक्षावाला, गुलाबराव पाटील यांना पान टपरीवाला, संदीपान भुमरे यांना हमाल आणि महिलांना खालच्या भाषेत हिणवलं जात असल्याचा आरोप करत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्रातील रिक्षा व्यावसायिक, पान टपरी व्यावसायिक, हमालांची आकडेवारी सांगत हा अपमान त्या व्यक्तीचा नाही तर तो व्यवसाय करणाऱ्या समुदायाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन उदय सामंत यांनी केले आहे. याच मेळाव्या दरम्यान विधान सभेच्या पायऱ्यांवर झालेल्या वादाचा किस्सा सांगताना भरत गोगावले यांनी विरोधकांच्या घोषणाबाजीची आठवण करून दिली.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. पण यावरील सुनावणी अद्यापही सुरू झालेली नाही. एकीकडे उद्धव ठाकरे गटातर्फे या वादावर घटनापीठाने लवकरात लवकर सुनावणी घ्यावी अशी मागणी केली आहे.

तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदार आणि प्रतोद भरत गोगावले यांनी मोठे विधान केले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये शिवसेना मेळाव्यात बोलताना भरत गोगावले यांनी हे विधान केले आहे. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटाचा वाद आता घटनापीठाकडे गेला आहे. त्यामुळे पुढची ४ ते ५ वर्ष काही निकाल लागणार नाही, तोपर्यंत पुढची निवडणूक देखील येईल, असे विधान भरत गोगावले यांनी केले आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.