श्रीदत्त चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सन्मान सत्कार करत कामगार नेते प्रभुदास(अण्णा) भोईर ह्यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा
प्रतिनिधी साबीर शेख
शेकाप चे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य माथाडी अँड जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रभुदास भोईर ह्यांचा अभिष्टचिंतन सोहळा पनवेल येथील खिडूकपाडा ह्या ठिकाणी पार पडला.
यावेळी कोरोना काळामध्ये कार्य केलेल्या अनेक योद्ध्यांना श्रीदत्त चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ, सफाई कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत ९५ प्रभृतींचा सत्कार करण्यात आला.
वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत शासकीय दाखले वाटप, शासकीय योजनेचे मार्गदर्शन सहकार्य करण्यात आले ह्यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांना अनेक सुविधांचा लाभ मिळाला.
ह्या प्रसंगी विविध क्षेत्रातील तसेच विविध, संघटना, संस्था अनेक उद्योग समूह अशा पक्ष श्रेष्टी ने उपस्थिती दर्शवली
प्रभूदास भोईर यांचे काम अतिशय चोख पणे ते करत असतात आणि आज वाढदिवसाच्या दिवशी देखील कोणत्याही प्रकारची अतिशबाजी न करता त्यांनी आज मोफत शासकीय दाखले वाटप शिबीर राबविल ही खरंच कौतुकाची बाब आहे असे सांगत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा महाराष्ट्र राज्य माथाडी अँड जनरल कामगार संघटना अध्यक्ष बाळासाहेब बोरकर ह्यांनी सांगितले.
आमदार नरेंद्र पवार यांनी प्रभुदास भोईर यांच्या समाज सेवेबद्दल आम्ही सर्व आश्चर्यचकित असतो की नक्की एक व्यक्ती किती जिल्ह्यात तालुक्यात अनेक लोकांना सहकार्य करत असतो. दत्त जयंती सोहळा कार्यक्रम दरवर्षी भक्तिभावाने करत अनेकांना आर्थिक ,शैक्षणिक ,वैद्यकीय मदत अण्णा करत असतात. माझे मित्र म्हणून मी स्वतःला भाग्यशाली समजतो .

आगामी निवडणुकीमध्ये लोक प्रतिनिधी म्हणून त्यांना समाजसेवा करण्यासाठी जनता निवडतील अशी इच्छा बाळगून पुढच्या वर्षी दत्त जयंती कार्यक्रम प्रसंगी आपण सर्व त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून शुभेच्छा देऊ अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो असे सांगितले. आपल्या जीवाची परवा न करता आपली कामगिरी बजावली अशा कोरोना सर्व योद्यांचा पुरस्कार व्हावा अशी मनापासूनची माझी इच्छा होती आणि म्हणून वाढदिवसाचे औचित्य साधून संघर्ष योद्धा पुरस्कार कार्यक्रम घेत आहोत. अनेक शोषित, वंचित, अशिक्षित गरजू लोकांना कागदपत्र बद्दल माहिती जनजागृती व्हावी व दहावी बारावी परीक्षाचे निकाल जाहीर झाले आहेत तर विद्यार्थ्यांना शासकीय कागदपत्रे मिळवताना कोणत्या समस्या येऊ नये म्हणून हे शिबीर राबवत असल्याचे प्रभुदास भोईर ह्यांनी कार्यक्रम प्रसंगी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबन दादा पाटील ,महानगर प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, पनवेल अर्बन बँक संचालिका माधुरी गोसावी,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,मोहन मुळीक, उप पोलीस निरीक्षक,वाहतूक शाखा व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील ,भाजपा नेते बाळासाहेब पाटील ,भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश भोईर, विजय भोईर,विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.