सुभाष नगरच्या रस्त्याचे नामकरण करण्यासाठी ग्रामस्थांची मागणी*

खोपोली प्रतिनिधी :-

रेल्वे-मस्को गेट ते सुभाषनगर ५० वर्ष जुन्या पुर्वपार रस्त्यास स्वर्गीय सरखाराम गेणु जाधव मार्ग व घरा समोरील चौकास जाधव मामा चौक नामकरण करण्यास सुभाष नगर ग्रामस्थांची आग्रही मागणी.*

सुभाष नगर ग्रामस्थ गेले दोन वर्ष रस्त्या साठी संघर्ष करीत आहॆ. खोपोली नगरपरिषदेने सुभाष नगर ग्रामस्थ व महिंद्र कंपनीनी कुठलेही मागणी नसतांना नवीन पर्यायी रास्ता वासरंग ठाकूरवाडी, अय्यप्पा मंदिर, सुभाष नगर ते जे. सी. एम. स्कूल चा कमाल सुरबत केली होती. ११ डिसेंबर रोजी सुभाष नगर खोपोली येथील ग्रामस्थांनी ५० वर्ष जुना रेल्वेगेट/मस्को गेट ते सुभाष नगर ( जाधव मामांचा घरा परियांत) रास्ता काम स्वरूपी जाण्या येण्यासाठी असावा नवी पर्यायी रास्ता नको याचे निवेदन तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्षा यांना सर्व ग्रामस्थांनी जाऊन नगरपरिषदे मध्ये भेटून दिले होते. ग्रामस्थांची आक्रमकता बघत नगर परिषदेने सदर नवीन रस्त्याचे काम ताबडतोब थांबवले.
सुभाष नगर ग्रामस्थानी नगर परिषदे कडे तीन प्रमुख मागण्या केल्या होत्या.
1. नवीन पर्यायी रास्ता नको 50 वर्ष जुना रास्ता कायम असावा.
2- सदर 50 वर्षे जुना रास्ता खराब झाला आहे त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे.
3. या रस्त्याचे खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सखाराम गेणू जाधव मार्ग व त्यांच्या घरा समोरील चौकस जाधव मामा चौक असे नामकरण व परिसर सुशोभीकरण करणे.
नवीन रस्ता आड मार्गी असल्यामुळे शाळा, कॉलेज, कामावर जाणाऱ्या माता भगिनींना सकाळी जाताना संध्याकाळी व रात्री येताना अडचणीचा होणार होता. या रस्त्यावरून येणाऱ्या रिक्षाचे भाडे येथे राहणार कामगार वर्गाला न परवडणारे आहॆ.

खोपोली शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते, १५ वर्ष नगरसेवक व ज्येष्ठ नेते असलेल्या आमचा गावातील या व्यक्तिीच्या नावाचा सन्मान म्हणून या रस्त्यास स्वर्गीय श्री. सखाराम गेणू जाधव मार्ग, त्यांचा घरासमोरील रस्त्याचा चौकास जाधव मामा चौक असे नामकरण करून त्या परिसराची सुशोभीकरण करण्यात यावे अशी सर्व सुभाष नगर मधील सर्व ग्रामस्थ खोपोली नगर परिषदे कडे मागणी आणि विनंती पुन्हा सर्व ग्रामस्थचा वतीने करण्यात आले. या सर्व संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांची भेट घेऊन रस्त्याचा संघर्ष संदर्भात चर्चा सुभाष नगरचे प्रमुख ग्रामस्थ राहुल जाधव, फरीद शेख, किशोर पुजारी, समीर गायकवाड यांनी केली. या वेळी के. के. कांबळे, गोपाळ बावस्कर उपस्तीथ होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.