भा ज पा चिञपट कामगार आघाडीच्या
महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्क प्रमुख
या पदावर प्रज्ञा पितळे यांची नियुक्ती
सामाजिक व चित्रपट कामगार अशा विविध क्षेत्रातील सहभाग बघता
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी सोबत संलग्न असलेली अखिल राष्ट्रीयसिने कलाकार अॅन्ड कामगार संघटना व भा ज पा चिञपट कामगार आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्क प्रमुख
या पदावर प्रज्ञा पितळे यांची नियुक्ती करण्यात आली.
त्या बद्दल त्यांचे त्यांच्या सर्व शुभ चिंतका कडून अभिनंदन होत आहे.
संघटनेचे विचार, कार्य, ध्येय,धोरणे, व विविध उपक्रम लोकांपर्यंत पोहचवण्याची त्यांची क्षमता त्यांच्या नियुक्ती चे कारण असल्याचे मत त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केले.
तसेच राज्यात संघटना वाढीसाठी , कामगार व कलाकारांच्या समस्या व संघटनेने दिलेले कार्यक्रम कामगारांच्या शाश्वत विकासासाठी राबवुन देशाच्या सर्वागीन प्रगतीमध्ये चित्रपटातील कामगार व कलाकार वर्गाचे स्थान अधोरेखित करण्याची जबाबदारी त्यांच्या वर आहे .
चित्रपट सृष्टीतील कामगार, कलाकार ,तंत्रज्ञ आणि इतर घटकांच्या सर्वागीन विकासासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी चा लढा त्यांच्या मार्फत करण्यात येईल म्हणून गणेश ताठे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भाजपा कामगार आघाडी , विजय सरोज अध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश
भाजपा चित्रपट कामगार आघाडी सत्यवान गावडे सरचिटणीस,महाराष्ट्र प्रदेश भाजपा चित्रपट कामगार आघाडी यांच्या सहमतीने प्रज्ञा पितळे यांची नियुक्ती करण्यात आली.