आई बाबा फाउंडेशन संस्था  आयोजित मानसोपचार विषयावर व्याख्यान ,मार्गदर्शन…

 

प्रतिनिधी(खालापूर)/साबीर शेख

रायगड जिल्ह्यातील ,खालापूर तालुक्यातील आसरेवाडी येथील आई बाबा फाउंडेशन संस्था जनजागृती अभियानांतर्गत रायगड हॉस्पिटल रिसर्च सेंटर कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानाने वैद्यकीय उपचाराचा भाग म्हणून मानसोपचार या विषयावर व्याख्यान ,मार्गदर्शन करण्यात आले.


सदर कार्यक्रमास रायगड हॉस्पिटलचे डॉ .वैभव डॉक्टर, श्रीवास्तव तसेच समुपदेशक अमोल लाले व हॉस्पिटल व्यवस्थापन ,परिचारिका उपस्थित होते. संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


व्यसनांमुळे निर्माण झालेल्या विविध मानसिक आजार व त्यावरील उपचार याबाबत सविस्तर प्रबोधन करण्यात आले.
यावेळी व्यक्तिगत सर्व रुग्णांची त्यांच्या मानसिक त्रासांवर चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.


आई बाबा फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष प्रवीण नवरे, ट्रस्टी प्रसाद ओक तसेच अन्य व्यवस्थापन उपस्थित होते.

वर्षभर व्यसनमुक्तीच्या उपचारा दरम्यान रुग्णांना वेगवेगळे वैद्यकीय मार्गदर्शन ,प्रोत्साहन कसे देता येईल व आरोग्यदायी, निरोगी, सामाजिक जवाबदार व्यक्ती कसा घडेल याबाबत संस्था विविध प्रयत्न करत असते . त्याचाच एक भाग म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.