महामारीच्या काळात आरोग्य सेवा  आपले कर्तव्य समजून वाढदिवस साजरा करू– प्रितम म्हात्रे

पनवेल । वार्ताहर ।
पनवेल मधील कोव्हिडचे अनेक रुग्ण आरोग्याशी लढताहेत अशा अनेक कुटुंबांना आधार देणे आपले कर्तव्य आहे म्हणून अशी सर्व परिस्थितीला पाहता वाढदिवस साजरा न करण्याचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी ठरविले आहे.

त्यासंदर्भात त्यांनी पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांना आरोग्य सेवा करण्याचे आवाहन केले आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने नागरिकांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून  द्यावे त्यांना लागणारी औषधे सामग्री त्यांच्यापर्यंत सहजतेने कशी पोहोचतील यावर लक्ष द्यावे. वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित न करता आजच्या महा मारीत लोकांच्या नोकरी आणि व्यवसायावर परिणाम झालेला आहे अनेक लोक आर्थिक ,मानसिक अडचणीत आहेत. त्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगार मेळावे कोव्हिडचे नियम पाळून कसे करता येतील जेणेकरून नागरिकांना रोजगार उपलब्ध होतील त्यांच्या कुटुंबाची गाडी चालेल व ते सर्व आपल्याला आशीर्वाद देतील अशा वेळेस आपण सर्वजण माझ्यासोबत या सेवा कार्यात भाग घ्याल अशी मी अपेक्षा ठेवतो असे बोलून प्रितम म्हात्रे यांनी वाढदिवसानिमित्त कोणताही बुके घेऊन मला भेटू नये, त्याऐवजी आपल्या घरातील जवळच्या परिसरात एखादे झाड लावून त्याचा सेल्फी काढून तो फोटो मला शुभेच्छा म्हणून पाठवाव्यात जेणेकरून भविष्यातील पिढीला ऑक्सिजन विकत न घेता पर्यावरण जोपासल्यामुळे त्याचा सहाजिकच फायदा होईल. या सर्व उपक्रमात कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास शेतकरी कामगार पक्ष आणि जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य मिळेल अशी भावना विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केले

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.