स्वच्छता मोहीम अंतर्गत किमान एक तास सर्वांनी मिळून संकल्प करून स्वच्छ सुंदर शहर बनवूया चला आपल्या शहरासाठी आपल्यांसाठी स्वइच्छेने श्रमदान करूया… मुख्याधिकारी अनुप दुरे

प्रतिनिधी /खोपोली साबीर शेख

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार खोपोली शहरातिल नगरपालिका तर्फे १७ सप्टेंबर रोजी स्वच्छता पंधरवडा अभियान राबविण्यात सुरुवात झाली .
खोपोली नगरपरिषद मुख्याधिकारी तसेच पालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांच्यासोबत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, जागरूक रहिवासी या मोहिमेत सामील होते.

 

या अभियानात खोपोलीकरांनी मिळून प्रदर्शन, रॅली घोषणा देत स्वच्छता मोहिमेत आज पासून जनजागृती करण्यात आली.या अभियानात प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानांतर्गत श्रमदानातून एक तास कार्य केले .

 

शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत इंडियन स्वच्छता लीग जॉईन ,खोपोली रायडर्स ,आपले शहर स्वच्छ सुंदर शहर असे जनजागृती फलक हातात घेऊन, सामूहिक पद्धतीने स्वच्छता मोहीम अंतर्गत कर्तव्य म्हणून शपथ घेण्यात आली.
नागरिकांनी आपल्या शहरासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्यांसाठी दिवसातून किमान एक तास स्वतः स्वइच्छेत स्वच्छता अभियान संकल्प म्हणून श्रमदान केल्याने उत्तम, सुंदर ,आरोग्यदायी शहर आपल्याला पाहायला मिळेल असा विश्वास आहे तरी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आव्हान मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी केले .

आज प्रारंभ करताना काठरंग, शिळफाटा व गगनगिरी महाराज मठ ते वीरेश्वर मंदिर येथील परिसरात श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.