लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना खाडे चव्हाण सर्वोत्कृष्ट शाळा प्रमुख पुरस्काराने सन्मानित

पनवेल(प्रतिनिधी) कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना खाडे चव्हाण सर्वोत्कृष्ट शाळा प्रमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 शिक्षणाच्या विस्तारासाठी मिश्रित शिक्षणाने संधी उपलब्ध करून दिली आहे. ही विद्यार्थी केंद्रित पद्धत अलीकडच्या काळात खूप यशस्वी ठरली आहे. सर्वोदय स्कूल कॉम्प्लेक्सने सिंघानिया क्वेस्ट प्लस च्या संयुक्त विद्यमाने, मिश्रित शिक्षणावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते जे कोरुना संकटाच्या काळात सामान्य झाले. या कार्यक्रमासाठी विविध शाळांमधील ७० हून अधिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना खाडे चव्हाण यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्राच्या शेवटी सात जूरी सदस्यांनी उत्कृष्ट शाळा प्रमुखपुरस्कार नामंकानांचे मूल्यमापन केले.नामांकनांमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे येथील मुख्याध्यापिका अर्चना खाडे चव्हाण यांना शैक्षणिक क्षेत्रातील प्रशंसनीय योगदानाबद्दल सर्वोत्कृष्ट सर्वांगीण शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा प्रमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मुख्याध्यापिका अर्चना खाडे चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी  रायगड विभागीय अधिकारी रोहिदास ठाकूर, पीआरओ बाळासाहेब कारंडे आदि उपस्थित होते.

————/////////—-//////////—-/////////————

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.