खोपोली शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आयोजित महाप्रबोधन यात्रा
प्रतिनिधी /खोपोली:(साबीर शेख)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आयोजित
यात्रा महाप्रबोधन यात्रा येत्या शनिवारी सायंकाळी ६ वाजता हायको कॉर्नर जवळ
आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला शिवसेना उपनेते सचिन अहिर, उपनेत्या सुषमा अंधारे, उपनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना नेते भास्कर जाधव उपस्थित राहणार असून या महाप्रबोधन यात्रेच्या आयोजनातून ठाकरे गट तर्फे सेनेचा आवाज
घुमणार असल्याने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
तसेच यावेळी शहर आणि खालापूर तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे खोपोलीत उद्घाटन होणार असल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत दिली.
महाप्रबोधन यात्रा खोपोलीत होत असल्याच्या पार्श्वभूमिवर कॅम्पोलिन हॉटेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सावंत, सल्लागार नवीन घाटवल,विधानसभा संपर्कप्रमुख डॉ. सुनील पाटील, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, युवासेना चिटणीस प्रशांत खांडेकर, भाऊ सणस,विलास चालके, दिलीप पुरी, अनिल सानप, पंकज रुपवते, संकेत सोरटे, संतोष देशमुख,मुकुंद बेंबडे, महिला आघाडीच्या जैबुनिसा शेख, किशोरी शिगवण यावेळी उपस्थित होते.
महाप्रबोधन यात्रेच्या कार्यक्रमाची रूपरेषा पत्रकारांसमोर सांगितल्यावर पटांगणाची पाहणी आयोजक शिष्टमंडळाने केली.
भव्यदिव्य व्यासपीठ, आसन व्यवस्था व टीव्ही स्क्रीन बसविण्यात येणार आहे.