डॉ. श्री नानासाहेब  धर्माधिकारी प्रतिष्ठान , रेवदंडा ,ता. अलिबाग , तर्फे पनवेल मधील   महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात  स्वच्छ्ता अभियान
पनवेल दि. ०२ ( वार्ताहर ) : पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी  महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे सकाळी  स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. 
                 सकाळी सात वाजता सर्व श्री सदस्य स्वयं स्फूर्तीने उपस्थित होते. ७.३० वाचता अभियानास सुरवात झाली यात ५०० हून अधिक श्री सदस्यांनी सहभाग नोंदविला त्यावेळी हॉस्पिटल मधील भिंती स्वच्छता, पंखे, लाद्या, परिसर स्वच्छ करण्यात आले , यासाठी  डॉ श्री नानासाहेब प्रतिष्ठान तर्फे , साफ सफाई साठी लागणारे सर्व साहित्य पुरविण्यात आले . नेहमीच  डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले जातात त्यामध्ये स्वच्छ्ता अभियान , वृक्ष लागवड  आणि  वृक्ष संवर्धन , रक्त दान शिबिर , जल पुनर्भरण , प्रौढ  साक्षरता अभियान , आदी उपक्रम प्रामुख्याने असतात .

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.