पनवेल महानगरपालिकेच्या जाचक करप्रणाली विरोधात महाविकास आघाडीचा जनआक्रोश महामोर्चा

प्रतिनिधी /पनवेल

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख बबनदादा पाटील व मा आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या महामोर्चामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, ऍड सुरेश ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, मा.नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, काँग्रेस नेते आर सी घरत, मा विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे, खारघर फोरमच्या अध्यक्षा व मा नगरसेविका लीना गरड, सतीश पाटील, दीपक घरत, शशिकांत डोंगरे, एकनाथ म्हात्रे, विश्वास पेटकर, योगेश तांडेल, शिवदास कांबळे, शशिकांत बांदोडकर, कॅप्टन कलावत, नारायण घरत, काशिनाथ पाटील, फारुख पटेल, मल्लिनाथ गायकवाड, मा नगरसेवक गणेश कडू, रवींद्र भगत, महादेव वाघमारे, महिला आघाडीच्या अनुराधा ठोकळ, वैभव पाटील, मा नगरसेवक सुनील बहिरा यांच्यासह महाविकास आघाडीचे

पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, सामाजिक संस्था, व्यापारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.