सॅटर्डे ग्लोबल क्लब ट्रस्ट मराठी उद्योजकता दिवस साजरा करणार

पत्रकार परिषदेत १२ जुलै रोजी नवीन उद्योजकांना  जोडण्याचा केला  आव्हान

एकमेकास सहाय्य करू.. आपण ही होऊ श्रीमंत..

प्रतिनिधी नविमुंबई:-

२२ वर्षांपूर्वी स्व. माधवराव भिडे यांनी सॅटर्डे ग्लोबल क्लब ट्रस्टची स्थापना केली.

मराठी उद्योजकांसाठी मौलिक कार्य करणाऱ्या सॅटर्डे क्लब संस्थेचा १२ जुलै हा स्थापना दिवस जो ह्या वर्षी मराठी उद्योजकता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.

मराठी उद्योजकता दिवस हा कार्यक्रम मंगळवार दि.१२ जुलै २०२२ रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संध्याकाळी ४. ह्या संपन्न होईल.

गर्भश्रीमंत ह्या यादीत मराठी माणसे हि असावा . हे ध्येय ठेवून त्या आर्थिक परिस्थिती बद्दलण्यामागे एक संघर्ष करणारी उद्योजक संघटना म्हणजे सॅटर्डे ग्लोबल क्लब ट्रस्ट

• मराठी माणसाने नोकरी सोडून उद्योग ,धंदा करणे, एकत्र येऊन परस्परांना व्यवसाय देणे, थोड्या यशात संतुष्ट न राहता आपल्या उद्योगाची जगभरात प्रगती करणे ,स्वतःची मानसिकता बदलून श्रीमंतीच्या वाटेवर मार्गस्थ होणे हा  सॅटर्डे क्लबचा मुख्य उद्देश आहे

उद्योजकांना व्यवसायिक प्राथमिक सुविधा उपलब्ध करून त्यांना आर्थिक प्रक्रिया व आधुनिकते बाबत मार्गदर्शन करणे असे प्रमुख विषय संघटनेमार्फत केले जातात.

पुढील वर्षांत मराठी उद्योजकांचे जाळे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात पसरवून यशस्वी करायचे आहे .

क्लब सोबत आता पर्यंत पन्नास हजार व्यावसायिक संपूर्ण
महाराष्ट्रात दहा हजार उद्योजक म्हणून जोडले गेले आहेत.
यशस्वी पद्धतीने करोडोंचा व्यवसाय परस्परांमध्ये करत आहेत…
• लाखो मराठी उद्योजकांना सॅटर्डे क्लब संस्थेशी जोडण्याचा मानस आहे. ह्यातून मराठी माणसाचा ठसा उद्योग जगतावर निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न असेल.

ह्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय) आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ना.नारायण राणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे .
केंद्र सरकार उद्योग जगतासाठी कार्य उपाययोजना करत आहे.
कुठल्या संधी उपलब्ध आहेत, मराठी उद्योजक ह्या संधीचा फायदा कसे घेऊ शकतील ह्यावर ते मार्गदर्शन करतील.
त्याच बरोबर इलेक्ट्रिक स्कुटर (दुचाकी) उद्योग हा सध्या अतिवेगाने प्रगती करणारा उद्योग आहे, ह्या क्षेत्रात अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत ,पण संपूर्णपणे भारतीय बनावट असलेल्या ई-स्कुटर बनवणारी ईव्हीट्रिक कंपनीचे संस्थापक मनोज पाटील तसेच टॉयलेट मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले थर्माकोल पासून टॉयलेट बनवणारे उद्योजक रामदास माने मार्गदर्शन करतील.

हा कार्यक्रम  विनामूल्य असून उद्योजक व अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करेल. आर्थिक दृष्टीने नवीन मार्ग निर्माण करेल म्हणूनच जास्तीत जास्त उद्योजक निर्माण होण्यासाठी इच्छुकांनी संघटनेचे महत्व व अभियान सोबत सहकार्य करण्यासाठी उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात आले.

महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांनी एकत्र यावे आणि एकमेकांना मदत करून व्यवसाय वृद्धी करावी. ह्या कार्यक्रमाबद्दल माहिती देतांना संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आणि संचालक  अशोकराव दुगाडे म्हणाले “महाराष्ट्रातील तमाम मराठी उद्योजकांना
आमचे आवाहन आहे कि ह्या मराठी उद्योजकता दिवसाच्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावावि.

मराठी उद्योजकांना श्रीमंतीचा मार्ग दाखवणाऱ्या आणि त्यांना व्यवसायात प्रगतीशील करण्यासाठी उदयोजकतेसाठी सॅटर्डे क्लब कश्याप्रकारे उद्योजकांना घडवत आहे हे समजण्यासाठी
सातत्यपूर्ण काम करणाऱ्या सॅटर्डे क्लबने उभारलेल्या चळवळीत प्रत्येक मराठी उद्योजकाने सहभागी व्हावे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.