मराठी इंडियन आयडल हा रायगडातील कोप्राली-उरणचा सागर म्हात्रे ठरला.

प्रतिनिधी :-

सोनी मराठी टीव्ही वाहिनीवर सुरू असलेल्या प्रतिष्ठित अशा मराठी इंडियन आयडॉल या कार्यक्रमात नेमका कोण विजेता होणार?  याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. अखेर बुधवारी उरणच्या सुपुत्राच्या गळ्यात विजेत्याची माळ पडलीच.
सागर विश्वास म्हात्रे याने हा किताब पटकावला असला तरी सागर याच्या या विजयानंतर त्याचे वडील विश्वास म्हात्रे यांना आनंदाश्रू अनावर झाले असून माझे खऱ्या अर्थाने स्वप्न साकार झाल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
 पनवेल, उरणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बुधवारी त्याला सोनी टिव्हीवर विजयी घोषित केल्यानंतर उरण कोप्रोली परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
गुरुवारी सकाळीच कोप्रोली येथे मिरवणुकीने सागरचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मला घडविणाऱ्या माझ्या आई वडिलांसह मला मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदशकांचा मी ऋणी असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
गेल्या काही महिन्यांपासून सागर विश्वास म्हात्रे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मराठी इंडियन आयडॉलमध्ये सहभाग घेतला व महाराष्ट्राचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मनावर अधिराज्य गाजवून संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले. सागर म्हात्रे याने इंडियन आयडॉलमध्ये सहभाग घेतल्यानंतर पनवेल, उरण परिसरासह महाराष्ट्रातील त्याच्या हितचिंतकांनी त्याला भरभरून मते देऊन उच्च स्थानावर नेऊन ठेवले.

सोनी मराठी वाहिनीवरील मराठी इंडियन आयडलचे अगदी पहिले वाहिले पर्व सर्वच प्रेक्षकांना अतिशय भावले होते. इंडियन आयडलच्या या पहिल्याच परवाने सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवले. आणि या मराठी इंडियन आयडलचा महाअंतिम सोहळा २० एप्रिलला पार पडला. मराठी इंडियन आयडलच्या पर्वाचा पहिला मराठी इंडियन आयडल हा रायगडातील कोप्राली-उरणचा सागर म्हात्रे ठरला. सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.