मिस्टर वर्ल्ड २०१६ राहीलेला अभिनेता व मॉडेल रोहीत खंडेलवाल याने ज्या सौंदर्यवतीना फॅशेन चे धडे दिलेत त्यांनी अंतिम फेरीत आपल्या सौंदर्य व बुद्धिमत्ताने सर्वांची मने जिंकलीत. वाशीच्या सिडको सभागृहात मिस अँड मिसेस मेसमेरिक क्विन इंडिया २०२१ ही सौंदर्यस्पर्धा मोठया थाटात संपन्न झाली. गुरमित गारा ग्रुमिंग स्कुल यांच्या वतीने या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जी मिस, मिसेस (प्रीमियम व क्लासिक) या श्रेणीत पार पडली.

मिस या श्रेणी मध्ये आयुषी गौतम आणि उपविजेत्या म्हणून तनिष्का शेट्टी आरुषी सिंग या ठरल्यात, विवाहित महिलांच्या प्रीमियम श्रेणीत राधिका ठक्कर हि विजेती तर उप विजेती म्हणून सोनल शहा व प्रियंका थोरात या  जिंकल्यात. क्लासिक श्रेणीत रितिका बन्सल हिने मुकुटावर आपले नाव कोरले तर उपविजत्या म्हणून मोनाली जगताप आणि झैबुन्निसा शेख यांनी जिंकत स्वतःला सिद्ध केले.

या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना आयोजक गुरुमित गारा यांनी सांगितले कि ” हि स्पर्धा यशस्वी होण्याकरिता स्पर्धकांनी खूप मेहनत घेतली, सौंदर्यस्पर्धा आत्मविश्वास सिद्ध करण्याची असते .ज्या मध्ये सहभागी सर्वच स्पर्धकांनी आपल्या परीने स्वताला सिद्ध केले. भविष्यात स्पर्धा देश्याच्या कानाकोपऱ्यात आयोजित करण्यात येईल आणि मुंबई मध्ये होणाऱ्या अंतिम फेरीत देश पातळीवरील स्पर्धकांना जिंकण्याची संधी मिळेल.”

परीक्षक म्हणून डॉ. संजीव कुमार , डॉ. संगीता दिवेकर, यामिनी डोगरा कांग, सुमित दासगुप्ता , ख्रिस्तटॉप कौटेटर्स आणि अशोक मेहरा यांनी जबाबदारी पार पाडली. क्रिएटिव्ह डिरेक्टर पाहूलदीप गारा, रनवे डिरेक्टर दिनेश राजपुरोहित , डिझाइनर आयएनआयएफडी पनवेल तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश मिराजकर यांनी करत अधिकच रंगत भरली.

या वेळी डॉ.विजय शुक्ला, मुख्य प्रायोजक ड्रीम्स मेकर्स च्या सौम्या सिंग, प्रो ऍक्टिव्ह शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड चे कॅप्टन प्रसन्नजीत कुमार, चित्रपट निर्माते संदीप नगराळे, लाफी पॉल, सिंधू नायर, विकेश कुमार (एक्सडी फोकल) व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.