भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती
प्रतिनिधी साबीर शेख विशेष वृत्त
12 ऑगस्ट 2022 रोजी भाजपा राष्ट्रीय कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती केली नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात यांचा सत्कार नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी यांनी रेशीमबाग येथील संघाचे संस्थापक परमपूज्य डॉ. केशव हेडगेवार यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन मुंबईत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना अभिवादन
केले .
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदन केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले
·मुंबई आगमनानंतर आज स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मारक स्थळ, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार ऍड. आशिषजी शेलार, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाल्यानंतर आज त्यांनी मुंबई प्रदेश भाजप कार्यालयात प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यानी पदभार स्वीकारला .
यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रदेश कार्यकारणी सर्व मोर्चाचे पदाधिकारी अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,संघटन मंत्री तथा आमदार श्रीकांत भारतीय, आम.नितेश राणे,आम प्रवीण दरेकर,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,
बाळासाहेब पाटील, ऍड. मनोज भुजबळ, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील,
अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष हाजी एजाज देशमुख, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार सय्यद अकबर आदि कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत व अभिनंदन केले.