सर्वसामान्यांसाठी धावून येणारा देव माणूस… श्रीपत सुर्यवंशी
प्रतिनिधी खोपोली /(साबीर शेख)
मा.नगरसेविका तथा शिक्षण,सभापती वनिता हरीश काळे यांचे पिताश्री श्रीपत सुर्यवंशी ( मामा)हे हृदयविकाराने त्रस्त असल्याने त्यांना मायनर अॅटक आला होता.
वैद्यकीय उपचार करून सुखरुप हॅास्पीटलमधुन निवास्थानी परतल्याची माहिती कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना कळताच आपल्या माणसाच्या तब्बेतीची विचारपुस करण्यासाठी त्यांनी श्रीपत सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी जाऊन आवर्जुन भेट दिली .
आपला हक्काचा ,आपला माणुस,
आपला आमदार विधानसभा कुटुंबप्रमुख आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो अशा शब्दात सूर्यवंशी परिवाराने आमदार थोरवे यांचे आभार मानले.
त्यावेळी माजी नगरसेविका वनिता हरीश काळे समस्त सूर्यवंशी परिवार तसेच एकता मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष तथा खोपोली शहर संपर्कप्रमुख हरीश काळे तसेच शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते