भाजपचे युवा नेते नंदकुमार म्हात्रे यांच्याकडून स्वखर्चाने धानसर क्रीडांगणावर नवीन स्टेज; ग्रामस्थांनी मानले आभार
 
महानगरपालिका क्षेत्रातील धानसर येथे झालेल्या ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट’ स्पर्धेत वळवली संघाने बाजी मारत आमदार चषक पटकाविला. द्वितीय क्रमांक वडवली तर खुटारी संघाने तृतीय क्रमांकाचा मान मिळविला.
महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, मोतीरामबुवा कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. भाजपचे युवा नेते नंदकुमार म्हात्रे यांनी स्वखर्चाने धानसर क्रीडांगणावर नवीन स्टेज बांधून दिले आहे, त्याबद्दल यावेळी अनेक मान्यवरांनी नंदकुमार म्हात्रे यांचे कौतुक केले.तसेच ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. 
          युवा नेते नंदकुमार म्हात्रे यांच्या स्वखर्चाने धानसर गावासाठी उभारण्यात आलेल्या नवीन स्टेजचे तसेच जय गणेश्वर क्रिकेट संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक’  क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले होते. दिन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा पारितोषिक रविवारी सायंकाळी संपन्न झाला. या स्पर्धेला महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, नगरसेवक हरेश केणी, रविकांत म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, उद्योजक विनोद पाटील, हरिदास पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन तांबे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. 
 या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या वळवली संघास ५० हजार रुपये व भव्य चषक, वडवली संघास द्वितीय क्रमांक  २५ हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या खुटारी संघास १५ हजार रुपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा मान वळवली संघाचा खेळाडू अजिंक्य यांनी,  उत्कृष्ट गोलंदाज वळवली संघाचा रत्नदीप, तर मालिकावीर सतिश जाधव, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून खुटारी संघाचा खेळाडू मयूर म्हात्रे याने पटकाविला. या सर्वाना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका चिटणीस सुरेश पोरजी, बुथ अध्यक्ष जितेंद्र पोरजी, ग्रामपंचात सदस्य नाना पोरजी यांच्यासह जय गणेश्वर क्रिकेट संघ व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली. 
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.