पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते २५० बौद्धिक दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप
पनवेल(प्रतिनिधी)
राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, (दिव्यांगजन) क्षेत्रीय केंद्र खारघरमध्ये आज (दि. १७ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने २५० बौद्धिक दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्याचे ( किट) वाटप करण्यात आले.
    सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या दरम्यान संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२ वा वाढदिवस साजरा होत आहे. या शुभप्रसंगाचे औचित्य साधुन संपूर्ण देशभरात ७२ ठिकाणी सामाजिक अधिकारिता शिबिरांचे आयोजन केलेले होते. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व शिबिरांमध्ये ऑनलाईन माध्यमाने थेट उपस्थित होते.  सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचे डॉ .वीरेंद्र कुमार याच्या मार्गदर्शनाखाली या सर्व ७२ ठिकाणी शिबिरांमध्ये आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर, आयुष मंत्रालय मुंबई होमिओपॅथी अनुसंधान प्रभारी अधिकारी डॉ. रमेश बावसकर, विशेष शिक्षण व्याख्या डॉ. गायत्री अहुजा, अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थान, मुंबई आणि  डॉ.रवी प्रकाश सिंग प्रभारी अधिकारी राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, (दिव्यांगजन) क्षेत्रीय केंद्र नवी मुंबई या मान्यवरच्या हस्ते २५० बौद्धिक दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्याचे ( किट) वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, माजी नगरसेवक रामजी बेरा, सामाजिक कार्यकर्ता गिरीश गुप्ता, सह संयोजक उत्तर भारतीय सेल शैलेन्द्र त्रिपाठी,  हे मान्यवर उपस्थित होते.
      या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन प्रकाश तोरणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्याच बरोबर या कार्यक्रमाला बौद्धिक दिव्यांगजन मुले, त्यांचे  पालक, राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, (दिव्यांगजन) क्षेत्रीय केंद्र नवी मुंबई येथील सर्व कर्मचारी वर्ग आणि प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.