पनवेल तालुक्यातील तळोजामधील मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात..
तळोजा : मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
मात्र पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. दुपारच्या अजानवेळी तळोजा फेज वन याठिकाणी मशीदीसमोर हनुमान चालीसा लावण्यासाठी आलेले मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
तळोजा फेज वन याठिकाणी मनसे कार्यकर्ते मशीदीसमोर हनुमान चालीसा लावण्यासाठी सज्ज झाले आणि त्याच वेळी तळोजा पोलिसांनी तालुका अध्यक्ष रामदास पाटील, उपतालुका अध्यक्ष कैलास माळी, उपतालुका अध्यक्ष सुरज गायकर, विभाग अध्यक्ष तळोजा योगेंद्र पाटील, क्रांतीलाल पाटील, राजेश पाटील, रोशन पाटील, करण पाटील, रोहित कोरडे मनसैनिकांना ताब्यात घेतले..