महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या दणक्याने वाहन मालकाला मिळाला न्याय
टाटा वाहन समूह कल्याण शाखा येथील सुदर्शन मोटर्सचा बेजबाबदारपणा मनसे सैनिकांनी केला उघड
प्रतिनिधी /
कल्याण येथील रहिवासी आशिष औदत यांच्या टाटा नेकसा वाहनात अचानक पणे बिघाड झाल्याने पनवेल कामोठा येथील हेरिटेज टाटा व्हेईकल सर्विस सेंटर येथे वाहन दुरुस्तीसाठी आणण्यात आले.
संबंधित वाहनाच्या तपासात सर्विस मॅनेजर अजय नलावडे यांच्या परीक्षणानंतर क्लच व प्रेशर प्लेट खराब झाल्याने वाहन मालका कडून अंदाजे रक्कम 13 हजार घेण्यात आले.
घटनास्थळी मनवीसे मावळ ज़िल्हा संघटक सुनील गाडेकर व त्यांचे शिष्टमंडळ यांच्याकडे ही तक्रार प्राप्त झाल्याने या प्रकरणाची चौकशी पडताळणी-करण्यासाठी मनसे सैनिकांनी तज्ञ ऑटोमोबाईल इंजिनियर युवराज गाडेकर यांच्या परीक्षणात क्लच प्लेट व प्रेशर प्लेट खराब नसून ती उत्तम व योग्य असल्याचे निर्देशनात आणून दिले.
परंतु गाडीच्या झालेल्या मागच्या पि टू पी सर्विस दरम्यान कल्याण येथील सुदर्शन मोटर्सने बेजबाबदारपणे काम केल्याचे कृत्य समोर आले .
ही फसवी निंदनीय बाब संबंधित माहिती कामोठे सर्विस मॅनेजर यांच्या निदर्शनात आणल्याने तातडीने दखल घेत टाटा सर्विस सेंटर हेरिटेज यांनी एरिया सर्विस मॅनेजर ठाणे यांच्याकडे नोंद करून योग्य रित्या तांत्रिक दृष्ट्या बिघाड झालेल्या वाहनाचे काम पूर्ण करून दिले.
कल्याण शाखेतील टाटा मोटर्स समूहाच्या चे अधिकृत सर्विस सेंटर सुदर्शन मोटर्स हलगर्जी पणाने बे जबाबदार असे कृत्य सातत्याने करत असल्याचा अनुभव आशिष औदत यांना वारंवार आला. त्यांनी एक्सचेंज ऑफर मधून दिलेल्या जुन्या टाटा कारला अडीच वर्षाच्या कालावधीत उलटून गेला तरी अजून जुनी कार आशिष यांच्याच नावाने असून त्यावरील वाहतूक नियमांच्या उल्लंघनाची कारवाई त्यांच्याच नावाने होत असल्याचेही ट्रॅफिक पोलिसांकडून समजते
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे मावळ जिल्हा संघटक सुनील गाडेकर यांनी मनसेचे नेते प्रदीप वाघमारे, रमाकांत साळवी व मनसे सैनिक काशिनाथ शेंडगे यांनी वाहन मालक आशिष औदत यांना मौलाचं मार्गदर्शन पाठपुरावा करून न्याय मिळवून दिल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
कोड..
टाटा समूहाचे नाव विश्वासनीय असून सुदर्शन मोटर्स व्यवस्थापनिय कर्मचारी अशा विश्वास पात्रतेला बाधा ठरू शकतील म्हणून त्यांच्यावर टाटा मोटर्सने कारवाई करावी तसेच मनसे वाहतूक संघटना अश्या प्रकारे कोणावरही अन्याय होऊ देणार नाही मनसे सैनिक मराठी माणसाच्या कल्याणासाठीच आहे नागरिकांनी अश्या तक्रारी आढळल्यास मनसे वाहतूक च्या विभागाला कळवावे….
मनसे वाहतूक मावळ संघटक ..सुनिल गाडेकर