कसळखंड ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मोनिका महादेव पाटील यांची निवड करण्यात आली.
प्रतिनिधी (प्रेरणा गावंड):-

महेंद्र गोजे यांनी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी कसळखंड येथे उपसर पंच निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच माधुरी पाटील व ग्रामसेवक विश्वास वारे यांच्या उपस्थितीत निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महविकास आघाडी कडून उमेश पाटील तर भारतीय जनता पक्षातर्फे मोनिका महादेव पाटील यांनी आपले नामांकित अर्ज दाखल केले होते.यावेळी झालेल्या मतदानामध्ये उमेश पाटील यांना चार मते तर मोनिका पाटील यांना पाच मते मिळाली यामध्ये एक मत बाद होऊन उपसरपंच निवडणूकीत मोनिका महादेव पाटील यांच्या गळ्यात कसळखंड ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची माल पडली.
यावेळी मा.उपसरपंच महादेव पाटील म्हणाले की गेली कित्तेक वर्ष मी शेतकरी कामगार पक्षात होतो मी उपसरपंच असताना अनेक समाजपयोगी विकास कामं केली पण राजकिय षडयंत्र रचून माझ्याच माणसांनी माझ्या विरूद्ध कारस्थान करायला सुरुवात केली. म्हणून मला भारतीय जाणता पक्षात मला प्रवेश करावा लागला माझ्यावर विश्र्वास ठेऊन माझ्या पत्नीला आज त्यांनी उपसरपंच केले त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करेन असे ते म्हणाले तर सरपंच उपसरपंच यांच्या मध्यमातून चांगला विकास होइल असे सांगून सर्व सदस्यांचे अभार मानले.