हिंदू नवं वर्षाची सुरुवात आज  गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने ०२ एप्रिल रोजी जगभरात गुढी उभारून  मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

रमजान महिन्याची प्रारंभ आज चंद्र दर्शनाने होण्याची शक्यता

आस्था ,दानधर्म, दया ,प्रेम,एकता ,समानता ,मानवतेचा संदेश रमझान माह म्हणजे नाती जोडणारा सण मुस्लिम धर्मियांमध्ये मन आणि तन (शरीर) याचे शुध्दीकरण करणारा पवित्र सण म्हणजे रमझान महिना होय. महंमद पैगंबर यांनी या मानवता म्हणून सणाचे विशेष महत्त्व सांगितले आहे.
इस्लामची ही कालगणना चंद्रावर आधारित आहे. इस्लामच्या हिजरी
कालगणनेनुसार रमझान हा नववा महिना. पवित्र कुराण मध्ये महंमद पैंगबर यांनी मक्केहून मदिनेकडे जुलै १६, इ.स. ६२२ रोजी प्रयाण केले असल्याच उल्लेख आहे. त्या दिवसासून सुरु होणाऱ्या काल गणनेस हिजरी काल गणना म्हणतात. शाबान महिन्यानंतर चंद्र दिसाला की रमझान महिना सुरु होतो. रमझान महिन्यात अल्लाहच्या
निकट जाण्यासाठी ३० दिवस उपवास (रोजे) केले जातात. रोजा म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्ताच्या काळात अन्न व पाणी ग्रहण-प्राशन न करणे.
सूर्यास्तानंतर रोजा इफ्तार म्हणजे उपवास सोडला जातो. असे ३० दिवस उपवास केल्यानंतर; अखेरच्या दिवशी चंद्रदर्शन झाले की, रमझान ईद साजरी केली जाते.
इस्लाम धर्माच्या नियमांनुसार शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मुस्लीम व्यक्तीने रोजा करणे पवित्र मानले आहे. रमझान हा अल्लाहचा प्रिय महिना असल्याने महिन्यात प्रत्येक मुस्लिमाने रोजा ठेऊन अल्लाहची कृपा प्राप्त करून घ्यावी, असा संदेश महंमद पैगंबरांनी दिला आहे. ईमाणे एतबारने पाळलेला रोजा अल्लाह कबुल करतो. म्हणजे रमझानचे उपास करणाऱ्यांची मनोकामना अल्ल्ह पूर्ण करतो.
रमझान महिना पवित्र का आहे ? याचे कारण महत्वाचे आहे. रोजे ठेवणे म्हणजे फक्त उपवास करणे किंवा उपाशी राहणे असे नव्हे. उपवास करणाऱ्या व्यक्तिस काही मानसिक आणि व्यावहारिक नियम पाळावे लागतात.
रमझानच्या काळात डोळे, कान आणि तोंड याच्या वापरावर काही नैतिक  बंधने आहेत.
वाईट ऐकणे, बघणे किंवा बोलणे या तिन्ही गोष्टी रमझानच्या काळात वयं आहे. रोजा राखणे म्हणजे निश्चयाने काही गोष्टी रोखणे. या महिन्यात केवळ तहान-भूक या गोष्टींवरच नियंत्रण आणले जाते असे नाही तर अनेक चुकीच्या गोष्टी दूर सारल्या जातात. या काळात गरीब, निराधार व्यक्तींना जकात स्वरुपात मदत केली जाते. आपण जो आहार घेतो तोच आहार या व्यक्तींनाही दिला जातो. रमझानचा महिना म्हणाजे सदाचारी वर्तनाचा व्रतस्थ काळ होय.
या काळात पाच वेळा नमाज पढणे आणि कुराण वाचण्याचा नियम आहे.
रमझानची एक रात्र शबे कद्र म्हणून साजरी होते. त्या रात्री केवळ अल्लाहची आराधना करतात.
कोणाविषयीही मनात कटुता न ठेवता प्रेमभावना व्यक्त करण्याचा,
सुख-शांती-समाधानाचा संदेश देणारा महिना म्हणजे रमझान. स्नेहपूर्व भेटीचा दिवस म्हणजे रमझान ईद.
अशा या पवित्र व पावन गुढीपाडवा ,रमजान सणाच्या सर्वांना साप्ताहिक कोकण डायरीच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा !!!

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.