पनवेल महापालिकेने कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात राहण्यासाठी चाचण्यांवर नेहमीच भर दिला असून पालिकेने आत्तापर्यंत 10 लाखाहून अधिक चाचण्या महापालिका क्षेत्रात केल्या आहे. नव्याने आलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चाचण्यांसाठी सहकार्य करावे तसेच कोरोनापासून संरक्षणासाठी लसींचे दोन्ही डोसचे लसीकरण नागरिकांनी पूर्ण करावे असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

कोरोनाच्या काळात महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. कोरोनाच्या जास्त जोखीमीच्या काळात पालिकेने एका दिवसात साडे चार हजार ते पाच हजार चाचण्या पालिका क्षेत्रात केल्या. त्यातही ज्याठिकाणी कोरोनाबाधित आढळतो त्या इमारतीतील, वसाहतीतील प्रत्येकाच्या चाचण्या करून कोरोनाच्या विषाणूला आहे तेथेच रोखण्यासाठी टारगेटेड टेस्टींगवर भर दिला जात आहे. सध्या रोज साडे तीन हजार ते चार हजार चाचण्या केल्या जात आहे. प्रामुख्याने रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, डीमार्ट सारखे मॉल, बाजारपेठा याठिकाणी मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत.

त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेने कोव्हीड लसीकरणाच्या पहिल्या डोसचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले असले तरी दुस-या डोसचे सध्या 72 टक्के लसीकरण झाले आहे. दोन्ही डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने ज्यां नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण राहीले आहे त्यांनी लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करून घ्यावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. सध्या ‘हर घर दस्तक अभियान’ पालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविले जात आहे. या उपक्रमांतर्गत महापालिका क्षेत्रात भोंगा गाडी फिरवली जात आहे. यामध्ये विविध सोसायट्यांमधील ज्या नागरिकांचे लसीकरण राहीले आहे अशा नागरिकांनी भोंगा गाडीजवळ येऊन लसीकरण वाहिकेमध्ये आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. नुकतेच आदिवासी पाडयांवर वैद्यकिय पथकाने जाऊन लसीकरण केले.

संभाव्य तिसरी लाट आलीच तर आरोग्य सुविधांच्या दृष्टीने पालिका सक्षम असून यासाठीची पूर्वतयारी करण्यात आली असून कळंबोली येथील सीसीआय याठिकाणी 635 खाटांचे आयसीयू बेड्स आणि व्हेटिलेटर्स सुविधांसह कोव्हीड रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी ऑक्सिजन पुरवठा प्रणालीकडेही पालिकेचे विशेष लक्ष आहे

सद्यस्थितीत रूग्णसंख्या काहीशी कमी झालेली दिसली तरी कोरोना अद्याप संपलेला नाही हे नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेण्याबरोबरच, मास्क, सतत हात धुणे व सुरक्षित अंतर या कोव्हीड सुरक्षा त्रिसूत्रीचेच पालन करणे या गोष्टी नागरिकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.